मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ४० जागांच्या वर आलेली आहे. मात्र औरंगाबाद शहरात निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यालयाला सकाळपासूनचं पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे.
विधानसभा निकालाचे आकडे समोर येण्यास सुरवात झाली आहे. मात्र त्याआधीच सुरक्षेच्या कारणास्तव औरंगाबाद शहारतील भाजपच्या जिल्हा कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला असून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 9 जागांसाठी मतदान झाले होते.त्यात भाजपचे 3 ठिकाणी उमेदवार रिंगणात आहे. तर विधानसभा निकालानंतर कोणतेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पोलिस ककर्मचारी तैनात करण्यात आले आहे.