मराठवाड्यात लक्ष लागलेल्या लातूरमधील लढतीत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवार बंधूंचा विजय झाला आहे. लातूरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना विजय मिळाला आहे. अमित देशमुख यांनी 42 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊन विजय मिळवला. तर धीरज देशमुख 1 लाख 20 हजारांएवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. या विजयानंतर दोन्ही देशमुख बंधुंचा तिसरा भाऊ आणि अभिनेता रितेशने भावनिक ट्विट केलंय.
अमित देशमुख यांनी भाजपाच्या शैलेश लाहोटी तर धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला आहे. आपल्या दोन्ही बंधुंच्या विजयासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीने आपल्या लातूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. त्यामुळे, साहजिकच या विजयानंतर रितेशकडून भावना व्यक्त होणं अपेक्षित आहे. रितेशन विलारावांचा आठवण काढून एक भावनिक ट्विट केलंय. पापा, आम्ही करून दाखवलं, PAPA We did it असं लिहून रितेशने दोन्ही भावांच्या मतांच्या विजयाची आकडेवारी जाहीर केलीय. त्यासोबतच, लातूरमधील जनतेचे आभार मानले आहेत. आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि श्रद्धेबद्दल आपले आभार असे रितेशने लिहलं आहे. रितेशचं हे ट्विट व्हायरल होत आहे.
रितेशसह माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, वैशाली विलासराव देशमुख, लातुर शहर विधानसभेचे उमेदवार माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, अदिती देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, लातुर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख, दिपशिखा देशमुख यांनीही प्रचारात मोठा सहभाग घेतला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदार संघातून तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणूक लढवली. याआधी विलासराव आणि त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख सोबतच आमदार होते. त्यामुळे या दोघांनाही आमदार होऊन देशमुख कुटुंबातील दोन भाऊ आमदार असण्याची परंपरा कायम राखण्याची संधी मिळाली आहे.