शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 10:38 AM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तरुण भारतवर त्रोटक भाष्य; भाजपावर टीका नाही

मुंबई: राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देऊनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेना, भाजपामधील संवाद जवळपास बंद झाला आहे. त्यातच दोन्ही बाजूंकडून दबावाचं राजकारण जोरात सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्यानं भाजपावर शरसंधान साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राऊत सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर तोफ डागत आहेत. मात्र आज राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली नाही. त्यामुळे उपस्थित पत्रकारांना काहीसा आश्चर्याचा धक्का बसला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्यपालांच्या प्रस्तावित भेटीवर भाष्य केलं. राज्यपालांची भेट राजकीय नाही. ती सदिच्छा भेट आहे, असं राऊत म्हणाले. मात्र अशा बैठकांमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा होतच असते, असं सूचक विधानदेखील त्यांनी केलं. 'भगतसिंह कोश्यारी स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आम्ही याआधीही अनेकदा त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतलेलं आहे,' असं राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं.राज्यपालांच्या भेटीत राजकारणावर चर्चा होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना विचारला. त्यावर अशा भेटींमध्ये राजकारणावर चर्चा होतच असते. माझी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं राज्यपालांशी जे बोलायचं आहे ते बोलेन असं राऊत म्हणाले. त्यामुळे राज्यपाल आणि राऊत यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून सातत्यानं होणाऱ्या भाजपावरील टीकेला आज 'तरुण भारत'मधून प्रत्युत्तर देण्यात आलं. संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक असल्याची टीका तरुण भारतनं अग्रलेखातून केली. या टीकेला 'ज्याप्रकारे मुख्यमंत्री सामना वाचत नाही, तसं आम्हीदेखील सामना सोडून काही वाचत नाही,' असं उत्तर राऊत यांनी दिलं.  तरुण भारत वृत्तपत्र आहे हेच मला माहीत नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. राज्यपाल भेट आणि तरुण भारतवर बोलणाऱ्या राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर कोणतीही टीका केली नाही.तत्पूर्वी संजय राऊत यांनी काल रात्री एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं. 'दोस्ती उन्हीं से बनाओ जो निभाने की औकात रखते हो,' असं राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. यासोबतच राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा फोटोदेखील शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत 'सामना'सोबतच पत्रकार परिषदा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर जोरदार टीका करत आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस