मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यात मुसंडी मारली असून परळीनंतर बीड मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. जिल्ह्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील दोन दिग्गज मंत्र्यांचा पराभव राष्ट्रवादीचं बळ वाढवणारा आहे. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी तर बीडमधून संदीप क्षीरसागर यांनी या दोन्ही मंत्र्यांना पराभूत केलंय.
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भावा-बहिणीच्या आणि काका-पुतण्याच्या रोमांचकारी लढाईत बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. संदीप क्षीरसागर हे 1786 मतांनी विजय झाला असून त्यांनी काका जयदत्त यांना पराभूत केलं आहे. संदीप क्षीरसागर यांनी शेटच्या क्षणापर्यंत काकांना टक्कर देत विजयश्री खेचून आणली. अटीतटीच्या लढतीत संदीप यांनी विजय मिळवून विधानसभेची सीट काबिज केली. शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो. तसेच, पंकजा मुंडेंनाही पराभव न पचणार आहे. कारण, ही निवडणूक आव्हान वाटत नसल्याचं पंकजा यांनी म्हटलं होतं. मात्र, धनंजय यांनी 30 हजार मतांनी विजय मिळवत पंकजा यांचेच आव्हान आपल्याला नव्हते, हे दाखवून दिलंय.
तसेच, निवडणूक समोर ठेवून विकासाच्या चांगल्या कामात विरोधकांकडून भांडवल केले जात आहे. केवळ विरोधाला विरोध आणि व्यक्तीद्वेषातून आमच्या विरोधात राजकारण करून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल केली जात आहे. परंतु, सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले होते. तसेच, विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही, असा टोलाही जयदत्त अण्णांनी लगावला होता. मात्र, संदीप यांनीही आपण लहान पोरं राहिलं नसल्याचं दाखवून दिलंय.