मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी विरोधकांच्या सर्व टीकेला सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचं नाव बदलण्यावरूनही राज्यातील विरोधी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला. उद्धव ठाकरे म्हणाले,''टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असं बदलण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसताना तुम्हाला लाज वाटत नाही?'' ( Uddhav Thackeray slammed Narendra Modi)
नटसम्राट बघतोय असा भास झाला- मुख्यमंत्री विरोधक बोलत असताना मी नटसम्राट बघतोय असा भास झाला. शेवट केविलवाणा वाटला. कुणी किंमत देता का किंमत. सुधीरजी, काय तुमचा आवेश. चंद्रकांतदादा आणि देवेंद्रना भीती वाटायला लागली. माझ्यासारखं तुमचंही झालंय. कलागुणांना वाव मिळत नाही. मी फोटोग्राफर आहे, पण सध्या ते करता येत नाही... कलाकार हा कधी लपून राहत नाही, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला. ( CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha )
काही महत्त्वाचे मुद्दे...
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा...
- मराठी भिकारी आहे का?... छत्रपतींची भाषा भिकारी असू शकत नाही... छत्रपती नसते तर आम्ही सोडा, दिल्लीत बसलेत ते तरी असते का?
- सावरकरांना भारतरत्न द्या, दोन वेळा पत्रं गेली... कोण देतं पत्र... आमदारांची समिती देते का?...
- औरंगाबादचं संभाजीनगर जरूर करू, पण त्याच्याआधी मला ही पण तारीख पाहिजे... छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा...
- खोटेपणा करणं रक्तात नाही... बंद दाराआडही कधी खोटेपणा केला नाही... महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवला नाही...