03 Mar, 22 01:38 PM
एसटी विलिनीकरणाचा अहवाल सभागृहात मांडावा - सदाभाऊ खोत
एसटी विलिनीकरणाबाबतचा अहवाल सभागृहात मांडावा, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही. आंदोलनातून आम्ही बाजूला झालो, मग २ महिन्यात तुम्ही न्याय का देऊ शकत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी अंतिम लढा आता लढू जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोवर माघार नाही, आमदार सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारवर निशाणा
03 Mar, 22 12:47 PM
शोकप्रस्तावानंतर विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
विधान परिषदेत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, पद्मभूषण विजेते राहुल बजाज यांच्या शोकप्रस्तावानंतर दिवसभराचं कामकाज स्थगित, उद्या सकाळी ११ वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होणार
03 Mar, 22 12:12 PM
नवाब मलिकांच्या आरोपावर मुख्यमंत्री मौन कधी सोडणार? - फडणवीस
नवाब मलिकांच्या आरोपावर मुख्यमंत्री मौन कधी सोडणार? नवाब मलिकांना वाचवण्याचं कारण काय? हे सरकार दाऊद समर्पित सरकार आहे. दाऊदशी जमीन व्यवहार केल्याचे पुरावे समोर आले आहेत. नाना पटोलेही दाऊदला समर्थन करतायेत का? नवाब मलिकांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. अनिल देशमुख, संजय राठोड यांचे राजीनामे झाले मग नवाब मलिकांना पाठिशी कोण घालतंय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
03 Mar, 22 12:35 PM
मंत्री आदित्य ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य
03 Mar, 22 12:12 PM
आमदार संजय दौड यांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शीर्षासन आंदोलन
03 Mar, 22 12:11 PM
सत्ताधारी आमदारांची भाजपाविरोधात घोषणाबाजी, बीडच्या आमदारानं लक्ष वेधलं
03 Mar, 22 12:02 PM
सत्तेत येण्यासाठी भाजपाचे लोकं हापापले आहेत; यशोमती ठाकूर यांचं टीकास्त्र
सत्तेत येण्यासाठी विरोधकांची धडपड सुरू आहे. विरोधीपक्ष नेत्यांना नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. उत्तर प्रदेशमध्ये एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घातली त्यावेळी राजीनाम्याची मागणी झाली नाही. महाराष्ट्राचं नुकसान करण्यासाठी व सत्तेत येण्यासाठी हे लोक हापापले आहेत अशा शब्दात काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
03 Mar, 22 11:38 AM
विरोधकांच्या घोषणाबाजीत विधानसभेचे कामकाज सुरू
विधानसभा सभागृहात मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आमदारांनी गोंधळ घातला असून सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात आमदार घोषणाबाजी करत आहेत. मात्र सरकार पुरवण्या मागण्या, विधेयकं सभागृहात सादर करत आहेत.
03 Mar, 22 11:20 AM
राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे राज्यपालांनी अवघ्या काही मिनिटांत अभिभाषण आटोपतं घेतलं.
03 Mar, 22 11:02 AM
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाला सुरूवात
03 Mar, 22 11:00 AM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल, उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
03 Mar, 22 10:30 AM
विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदारांचं आंदोलन
03 Mar, 22 10:23 AM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान भवनात आगमन
03 Mar, 22 09:48 AM
ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर सर्वात आधी विधानभवनात पोहचले
03 Mar, 22 09:43 AM
मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच, पण...; फडणवीसांचा हल्लाबोल
राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची एक बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल केला. दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार. शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही असा आरोप फडणवीसांनी केला.
03 Mar, 22 09:39 AM
मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; स्वत: उद्धव ठाकरेही गैरहजर
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकत संघर्षाची नांदी दिली. स्वत: मुख्यमंत्री या चहापानाला उपस्थित नव्हते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बहुतेक सर्व मंत्री हजर होते.
03 Mar, 22 08:53 AM
असे फुसके बार काय वादळ उठवणार?; अधिवेशनापूर्वी शिवसेनेचा भाजपाला टोला
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन गाजेल, वाजेल किंवा वादळी ठरेल, अशी हूल विरोधी पक्षांतर्फे उठवली जात आहे. त्यात अजिबात तथ्य दिसत नाही. विरोधी पक्षांच्या लोकांनी आरोपांची राळ उडवायची व त्यातून वादळ उभे करायचे दिवस आता राहिलेले नाहीत. कारण विरोधकांचे आरोप द्वेषपूर्ण असतात. त्यामुळे ते आपटीबारही ठरत नाहीत. असे फुसके बार काय वादळ उठवणार? अशा शब्दात शिवसेनेनं अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष भाजपाला टोला लगावला आहे.