मुंबई : उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली असून बहुतांश जिल्ह्यांचा पारा ४० अंशांवर गेला आहे. भाजून काढणारा हा उष्णतेचा कहर २ एप्रिलपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे.मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू, हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र कच्छ, पूर्व मध्यप्रदेश, आणि दक्षिण उत्तर प्रदेशालादेखील इशारा देण्यात आला आहे. - भारतीय हवामानशास्त्र विभागकोकणवगळता संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी २ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट जाणवेल. ५ दिवसांत अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा नक्कीच मानवी शरीरावर लगेचच तसेच दूरगामी परिणाम होऊ शकतात. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञहे उपाय करू शकतादुपारी १२ ते ३ दरम्यान उन्हात जाणे टाळा.पुरेसे पाणी प्या.हलके, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला.दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा.ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबूपाणी, ताक आदी घरगुती पेये वापरा जे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात.
पुढील पाच दिवस हाेणार लाहीलाही! राज्यात २ एप्रिलपर्यंत धग राहणार; पारा ४० अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 8:20 AM