औरंगाबाद : पाऊस परतीच्या मार्गावर असतानाच राज्याच्या अनेक भागांत थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे थंडी जाणवत असून, काही दिवसांत थंडीच्या तीव्रतेत वाढ होईल आणि पुणे, नाशिकसह मराठवाड्यात यंदा जानेवारीत किमान तापमान ६ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, असे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक व हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. आॅक्टोबरमध्ये किमान तापमान २१ ते २२ अंशांपर्यंत राहते, परंतु गेल्या काही दिवसांत ते १९ अंशांपर्यंत खाली आले आहे. या २ अंशाची घसरणीमुळे यंदा कडाक्याची थंडी पडेल, असे संकेत आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमान घसरण अर्थात ग्लोबल कुलिंगवर संशोधन सुरू आहे. येणारा काळही जागतिक तापमानात घसरण दर्शविणाराच दिसत आहे. दोन्हीही गोलार्धातील ध्रुवीय प्रदेशात कमालीची थंडी पडली आहे. गेल्या हिवाळ्यात उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये त्याचा फटका दिसून आला होता.काही पिकांना फायदा, द्राक्षांना फटकाअतिशय थंड वाहणारे ध्रुवीय वारे दक्षिणेला सरकल्याने संपूर्ण महाराष्ट्राला स्वेटर घालायला भाग पाडले.यंदा ध्रुवीय वारे अरबी समुद्रावरून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागांना म्हणजे गुजरात, महाराष्ट्र अशाराज्यांना त्याचा चांगलाच तडाखा बसणार आहे, असे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.राज्यात वाढत्या थंडीचा फटका खान्देशातील द्राक्ष आणि कांदा उत्पादकांना बसू शकतो. परंतु गहू, सोयाबीनया पिकांसाठी हे वातावरण फायदेशीर असेल.आॅक्टोबरातील मान्सून महाराष्ट्रात उणेचमुंबई : देशात मान्सूनचा तडाखा आॅक्टोबरमध्येही सुरूच आहे. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात मान्सून अतिरिक्त कोसळला असून, महाराष्ट्रात मात्र आॅक्टोबरमधील मान्सूनची नोंद ५० टक्के उणे आहे. झारखंड, अरुणाचल, मणिपूर, मिझोराम या राज्यांतही पावसाचे प्रमाण कमी आहे.
महाराष्ट्र यंदा थंडीने कुडकुडणार! तापमान ६ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 5:43 AM