- लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात ३ हजार कोटी रूपये खर्च करून १२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे़ तर राज्यातील ६ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली असून २०२० पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.शहरातील पांझरा नदीपात्रात विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीचा वृध्दीदर साडेबारा टक्क्यांवर पोहचला असून त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे़ ज्यांनी भ्रष्टाचार केला ते आज जलयुक्त शिवार योजनेवर टीका करीत असून त्यांच्या टिकेला भीक घालत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ आपले सरकारभ्रष्टाचारावर घाव घालून सर्व क्षेत्रात पारदर्शकता आणत असून त्याचा अनेकांना त्रास होत असल्याचेही ते म्हणाले़ महापौर जनतेतून निवडावाज्याप्रमाणे नगराध्यक्ष जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय सरकारने घेतला तसाच महापौरही जनतेतून निवडला जावा, अशी मागणी आ. अनिल गोटे यांनी जाहीर सभेत केली़
महाराष्ट्र २०२० पर्यंत दुष्काळमुक्त करणार
By admin | Published: May 18, 2017 2:32 AM