मुंबई : सदृढ लोकशाही आणि भविष्यात मोठ्या संख्येने उपलब्ध होणारी तंत्रकुशल मनुष्यबळ यामुळे भारतासोबतच महाराष्ट्रही ‘फॅक्टरी आॅफ ग्लोब’ होण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओसाका (जपान) येथे व्यक्त केला.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जपानमधील जेट्रो उद्योगसमूह यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य गुंतवणूक प्रोत्साहन चर्चासत्रात मुख्यमंत्री अध्यक्षीय समारोपात बोलत होते. या चर्चासत्रात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, जेट्रोचे महासंचालक हिरोकी मत्सुमोटो, जेट्रो मुंबईचे महासंचालक टाकेहिको फुरुकावा आदी सहभागी झाले होते. यावेळी एमआयडीसी आणि जेट्रोकडून गुंतवणुकीबाबत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी ओसाका चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय समितीचे अध्यक्ष आणि मारुबेनी कॉर्पोरेशनचे (ओसाका) महाव्यवस्थापक मसाशी हासिमोटो तसेच कन्साई आर्थिक परिषदेच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेचे उपाध्यक्ष योशिमासा ओहाशी यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी ‘व्हिजिट महाराष्ट्र बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट’ परिसंवादामध्येही मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळमहाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची ही सर्वाधिक योग्य वेळ आहे. औद्योगिक क्षेत्रातील जपानच्या यशोगाथेने आम्ही प्रभावित झालो असून, त्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या देशातही औद्योगिक परिवर्तनास सुरुवात केली आहे. ओसाका येथील कन्साई आर्थिक परिषद आणि ओसाका चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
महाराष्ट्र बनणार ‘फॅक्टरी आॅफ ग्लोब’
By admin | Published: September 10, 2015 3:39 AM