मुंबई : महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. तसेच दमणगंगा-पिंजाड नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचे पाणी बाहेर सोडले गेले होते, ते आम्ही परत आणले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जाणार नाही. विरोधकांनी राजकारण करू नये. विरोधकांची मते जाणून याप्रकरणी राज्य सरकार विचार करेल आणि यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार या नद्यांचे पाणी गुजरातला वळविणयाबाबतचे वृत्त खोटे असून नर्मदा जोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प केंद्र सरकार मान्यता देणार आहे. कारण केंद्रीय जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्शतेखाली मे २०१५ मध्ये नदीजोड प्रकल्पासाठीच्या विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नादीजोड प्रकल्प राबून मुंबईस पाणी द्यावे. तसेच दमणगंगा-पिंजाळ व तापी-नारपार नर्मदा हे नदीजोड प्रकल्पासाठी २ हजार ६७५ कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नार-पार-तापी नर्मदा खोर्यातील सर्वसाधारण २०० मीटर उंचीच्या टप्प्यातील आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नदीजोड योजनांद्वारो गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर उर्वरित उपलब्ध पाण्यापैकी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील जास्तीत जास्त पाणी बोगद्याद्वारे वळवून महाराष्ट्रात कसे वापरात आणता येईल, याप्रकरणीचा अभ्यास राष्ट्रीय जलविकास अभिकरण यांनी करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील नार-पार योजनेंतर्गत नर्मदा नदीतून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ७५ टक्के पाणी मुंबईसाठी वापरण्यात येणार असून वैतरणातून मुंबईला दिले जाणारे पाणी गोदावरीला दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री
By admin | Published: July 18, 2015 12:15 AM