मुंबई :
पावसाळ्याच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत ८८०.६ या सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. हा अंदाज वर्तवितानाच यात पाच टक्क्यांचा कमी अधिक फरक राहील, अशी शक्यता वर्तविली आहे, तर जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात दमदार होईल, असा दावा करतानाच, महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिकच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राजस्थान, गुजरात, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे कमी पावसाचा धोका आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होईल.
मागील दोन्ही वर्षी मान्सूनवर ‘ला नीना’चा परिणाम झाला होता. प्रशांत महासागरातील ‘ला नीना’ दक्षिण पश्चिम मान्सूनपूर्वीच सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने ‘अल नीना’च्या घटनांचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे अचानक आणि तीव्र पावसाची शक्यता आहे. - योगेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायमेट.
कोणत्या महिन्यात किती पाऊस१०७% जून१००% जुलै९५% ऑगस्ट ९०% सप्टेंबर