Devendra Fadnavis : पालघर : वाढवण बंदरामुळे (Vadhavan Port) पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होतं. मात्र, ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी झाला आहे. कारण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट आहे. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो आहोत. आता त्यापेक्षा तिप्पट मोठं बंदर वाढवणमध्ये होत आहे. या बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते. पण ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे. मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आले आणि वाढवण बंदर सुरू करण्याच्या कामाला वेग आला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, आता पुढील २०० वर्ष हे बंदर राहील आणि नरेंद्र मोदी यांचे नावही राहील. भारताला पुढे नेण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगातील सर्व एअरपोर्ट रिक्लमेन्शन करून तयार केले आहे, असे वाढवण बंदर पाहून लोक म्हणतील. येत्या काळात मुंबई वाढणार आहे. वसई विरारमध्ये वाढणार आहे. येथील भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. आपण बंदराचं रिक्लेमेन्शन करणार आहोत, असे सांगत या ठिकाणी एअरपोर्टचेही रिक्लेमन्शन केले पाहिजे आणि तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दरम्यान, केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पासाठी तब्बल ७६००० कोटी खर्च करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.