शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

उत्तर प्रदेशला हरवून महाराष्ट्र विजेता

By admin | Published: January 01, 2015 11:53 PM

अपंगांची क्रिकेट स्पर्धा : सारंग लॉपेटो सामनावीर, रवी पाटील मालिकावीर

मालवण : मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर पार पडलेल्या अपंग क्रिकेटपटूंच्या टष्ट्वेंटी-२0 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशचा पराभव करत जेतेपद पटकावले. उत्तर प्रदेश संघाने दिलेले १०८ धावांचे आव्हान १६ षटकांत पूर्ण करताना महाराष्ट्रने ५ विकेट राखून दणदणीत विजयाची नोंद केली. विजयी महाराष्ट्र संघाला मान्यवरांच्या उपस्थितीत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. सामनावीर म्हणून महाराष्ट्राच्या सारंग लॉपेटो याने, तर स्पर्धेतील मालिकावीराचा मान महाराष्ट्राच्या रवी पाटील यांनी पटकावला.गेले तीन दिवस मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक व उत्तर प्रदेश या राज्यातील अपंग क्रिकेटपटंूच्या संघांची टष्ट्वेंटी-२0 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेची रंगत मालवणवासीयांनी अनुभवली. महाराष्ट्र संघाने साखळीतील दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर उत्तर प्रदेश संघाने हरियाणा विरुद्ध सरस धावगतीच्या जोरावर विजय मिळवित आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. आज, गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघाचा विलास नाबाद ३१, हरिबंद २०, राहुल १४ याच्या जोरावर २० षटकांत ८ गडी गमावून १०८ धावा उभारल्या. महाराष्ट्र संघाकडून रवी पाटील याने ४ षटकांत १८ धावा देत २ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करत महाराष्ट्र संघाने सारंग लॉपेटो ३५, रवी पाटील १९, लोकेश १५ यांच्या दमदार फलंदाजीवर ५ गड्यांच्या मोबदल्यात १६ व्या षटकांतच राणे यांच्या विजयी चौकाराने विजय निश्चित केला.उत्तर प्रदेशच्या पंकज याने ३ षटकांत २४ धावा देत २ गडी बाद केले. तडाखेबंद ३५ धावा करणाऱ्या सारंग लॉपेटो याला सामनावीर किताब देऊन गौरविण्यात आले, तर स्पर्धेत सहा गडी बाद करत आणि ७० धावा पटकावत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या रवी पाटील याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. विजेत्या महाराष्ट्र संघास रोख रुपये ७० हजार व चषक, तर उपविजेत्या संघास ५० हजार रुपये व चषक, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या हरियाणा व कर्नाटक संघांना प्रत्येकी २० हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक वाडेकर, सहदेव बापार्डेकर, संतोष साटविलकर उपस्थित होते. पंच म्हणून दिलीप सावंत, उमेश मांजरेकर, गुणलेखक राहुल परुळेकर, जावेद खान, निखिल वायरकर यांनी काम पाहिले. ग्राऊंडमन प्रकाश पाताडे, पांडुरंग पाताडे, संजय राऊत यांनी काम पाहिले. (वार्ताहर)