शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Winter Session 2022: ‘देवेंद्र फडणवीस रेटून बोलतात, तुम्हीतर मुख्यमंत्री आहात...’, अजित पवारांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 6:16 PM

'देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात, एकनाथ शिंदे बोलता तेव्हा एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही.'

Maharashtra Winter Session 2022: विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उद्देशून जोरदार टोलेबाजी केली. 'देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा सर्वजण टाळ्या आणि बाकं वाजवतात. मात्र एकनाथ शिंदे बोलत होते, त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नव्हता,' असं म्हणताच विधानसभेत एकच हशा पिकला.

देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे बोलतात, पण...अजित पवार पुढे म्हणतात की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा सभागृहात कोट्यवधींचा प्रस्ताव मांडतात तेव्हा भाजपचे आमदार टाळ्या वाजवत नाहीत. अध्यक्ष महोदय, तुम्ही टीव्हीमध्ये बघा. हरीश पिंपळे तुम्ही फक्त अधूनमधून वाजवायचे. तानाजीरावांनी आमच्याच लोकांना सांगितलं की, टाळ्या वाजवा. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना आक्रमकपणे विधानसभेत भूमिका मांडतात. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्या आक्रमकपणे बोलत नाहीत,' असा दावाही अजित पवारांनी यावेळी केला.

तुम्ही जरा मागे येत आहातपवार पुढे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणतात, 'राईट टू रिप्लाय देत असताना तुम्ही इतके अस्वस्थ होत होता की, माझं तुमच्याकडे लक्ष होतं. मी चेष्टा करत नाही किंवा गंमतीने बोलत नाही. माझं मुख्यमंत्र्यांना सांगण आहे, कुठलीही एखादी गोष्ट सांगत असताना, तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता करतो, प्रस्ताव पाठवला का? असं का बोलता? हे मी करणार, असं बोला. मान्यता वगैरे काय? तो तुमचा अधिकार आहे. हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलतात. तुम्ही मात्र जरा मागे मागे येतायत', असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे