Maharashtra Winter Session 2022: 'आमच्यात फुट पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी...' मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 07:10 PM2022-12-29T19:10:16+5:302022-12-29T19:10:45+5:30

Maharashtra Winter Session 2022:'माझं उपमुख्यमंत्र्यांच्या हाताकडे लक्ष होतं, ते बरोबर टाळ्या वाजवत होते.'

Maharashtra Winter Session 2022: 'No matter how much you try to split us...' Chief Minister's reply to Ajit Pawar | Maharashtra Winter Session 2022: 'आमच्यात फुट पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी...' मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

Maharashtra Winter Session 2022: 'आमच्यात फुट पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी...' मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

googlenewsNext

Maharashtra Winter Session 2022: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उद्देशून जोरदार टोलेबाजी केली. 'देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. एकनाथ शिंदे बोलतात, तेव्हा एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही,' असं अजित पवार म्हणाले. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी...
'अजित दादा, तुम्ही आमच्यात कितीही फूट पाडायचा प्रयत्न केला तरी आमच्यावर काही परिणाम होणार नाही. मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो. तुम्हाला वाटलं नव्हतं की, विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या घोषणा होतील, शेतकऱ्यांना आपण इतके पैसे देऊ. दादा तुम्ही सिलेक्टिव ऐकता. बरोबर ना..?' असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवत होते
शिंदे पुढे म्हणाले, 'आम्ही एका भूमिकेतून सरकार स्थापन केलंय. हे सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे. अनुषेश भरुन काढला पाहिजे, आम्ही तो भरुन काढला. याचं श्रेय सरकारला मिळू नये यासाठी तुमचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकवेळाला काय टाळ्या वाजवायची गरज नसते. जेव्हा घोषणा व्हायची किंवा निर्णय व्हायचा तेव्हा सगळे टाळ्या वाजवायचे. माझं उपमुख्यमंत्र्यांच्या हाताकडे लक्ष होतं, ते बरोबर टाळ्या वाजवत होते', असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अजित पवार काय म्हणाले होते? वाचा संबंधित बातमी- ‘देवेंद्र फडणवीस रेटून बोलतात, तुम्हीतर मुख्यमंत्री आहात...’, अजित पवारांचा चिमटा
 

Web Title: Maharashtra Winter Session 2022: 'No matter how much you try to split us...' Chief Minister's reply to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.