शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक

By admin | Published: October 17, 2014 11:19 PM

महिला एनसीसी कबड्डी : एकाचवेळी खेळल्या ‘कर्मवीर’ महाविद्यालयाच्या दहा मुली

इस्लामपूर : राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने (एन. सी. सी.) दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या महिला संघाने अंतिम फेरीत पश्चिम बंगालचा १९-९ असा १0 गुणांनी पराभव करीत सुवर्णपदकावर ‘कर्मवीर’ची मुद्रा उमटवली. तसेच राज्याचा पुरुष संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दिल्ली येथील राष्ट्रीय छात्रसेनेच्या कवायत मैदानावर या स्पर्धा १0 ते १७ आॅक्टोबर या कालावधीत झाल्या. यामध्ये महिला गटातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व १0 मुली या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या आहेत. एकाचवेळी संपूर्ण राज्याच्या संघात एकाच महाविद्यालयाच्या खेळाडू खेळणे ही दुर्मीळ बाब ठरली आहे. ‘कर्मवीर’ची रेश्मा मोरे हिने मुलींच्या, तर अजिंक्य वडार याने मुलांच्या संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे.महाराष्ट्राच्या महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत दबदबा निर्माण करताना आसाम, ओरिसा, उत्तराखंड, पंजाब या संघांचा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. पश्चिम बंगालबरोबरच्या अंतिम सामन्यात कर्णधार रेश्मा मोरे, मेघाराणी खोत, नेहा सांगलीकर यांच्या पकडीने पश्चिम बंगालची आक्रमणाची धार बोथट करून टाकली. तसेच पल्लवी जाधव, गौरी पाटील, पूजा पाटील, शीतल मोटे यांच्या आक्रमक व पल्लेदार चढायांनी त्यांचे क्षेत्ररक्षणही खिळखिळे करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सायली कुंभार, ऋतुजा पाटील, अश्विनी पाटील यांच्या अष्टपैलू खेळाने संघाने विजय मिळविला. पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र व दिल्लीच्या संघात लढत झाली. अजिंक्य वडार याच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या संघाने दिल्लीला चुरशीची लढत दिली. मात्र, शेवटच्या क्षणी २९-२७ अशा दोन गुणांच्या फरकाने दिल्लीने विजेतेपद पटकावले.‘कर्मवीर’चे क्रीडा प्रशिक्षक प्रा. वीरसेन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींचे सराव शिबिर झाले होते. महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियनचे कर्नल ओझा, सोनिया यादव यांचे या संघाला मार्गदर्शन लाभले. या विजेत्या संघाचे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, सरचिटणीस प्रा. डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)