शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

‘महाराष्ट्राचे अमेरिकेशी जिव्हाळ्याचे नाते’

By admin | Published: March 04, 2016 3:18 AM

अनेक भारतीय अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यात महाराष्ट्रातील लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. अमेरिकेत अनेक मराठी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात

मुंबई : अनेक भारतीय अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यात महाराष्ट्रातील लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. अमेरिकेत अनेक मराठी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात. तसेच मेक इन महाराष्ट्राच्या हाकेला सर्वाधिक प्रतिसाद अमेरिकेतील गुंतवणुकदारांनीच दिला. अमेरिकेतील तब्बल ३० गुंतवणुकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात रस दाखविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे अमेरिकेशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.मुंबईतील अमेरिकी दुतावासात आयोजित अमेरिकेच्या २४० व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच भारतीय - अमेरिकी ‘मिस अमेरिका २०१४’ नीना डाऊलुरी सन्माननीय अतिथी आणि अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सिल जनरल टॉम वाजडा कार्यक्रमाचे यजमान होते. जुलैमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता गृहीत धरून हा सोहळा मुंबईत चार महिने आधीच साजरा करण्यात आला. या वेळी दुतावासातील अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सादर केलेले भारताचे राष्ट्रगीत आणि युएस मरिनच्या संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीकडून सर्वात जुन्या लोकशाहीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.नीना यांनी या वेळी त्यांच्या भारतासंदर्भातील आठवणींना उजाळा दिला. तामिळनाडूत त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या शाळेबद्दल माहिती देत, आजही शिक्षणाच्या प्रसाराबाबत त्यांना विशेष आस्था असल्याचे सांगितले. त्यासाठीच त्या सध्या ‘स्टेम’ शिक्षणाच्या प्रसारासाठी काम करीत असल्याचे म्हणाल्या. टॉम वाजडा यांनी त्यांच्या भाषणात भारत- अमेरिकेतील साधर्मे अधोरिखित केली. दोन्ही देश बाहेरून येणाऱ्यांना सामावून घेतात आणि त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देतात, असे वाजडा म्हणाले. महात्मा गांधीच्या शिकवणीबाबतचा आदरही त्यांनी व्यक्त केला.दुतावासाच्या भव्य प्रांगणात अमेरिकेतील सहा राज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यात प्रत्येक राज्याच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली होती. तसेच तेथील विशेष खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेतील शहरांतूनच फिरत असल्याचा अनुभव पाहुण्यांना घेता येत होता. त्याचबरोबर अमेरिकी व्हिंटेज गाड्याचे प्रदर्शनही विशेष आकर्षण ठरत होते. अनेकांना या गाड्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. (प्रतिनिधी)