शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

अखंड महाराष्ट्राचा ठराव दाखल

By admin | Published: August 04, 2016 4:39 AM

अखंड महाराष्ट्राचा ठराव दाखल करून घेऊन त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केलेल्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी निर्णय राखून ठेवला.

मुंबई : अखंड महाराष्ट्राचा ठराव दाखल करून घेऊन त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केलेल्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी निर्णय राखून ठेवला. गेले चार दिवस स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. बुधवारी विरोधकांनी नियम २३ अन्वये चर्चा करण्याबाबत नोटीस दिली.कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय उपस्थित केला. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात, पण महाराष्ट्र अखंड राहील असे म्हणत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात शंका आहे, म्हणून या विषयावर सभागृहात चर्चा करावी अशी आमची विनंती आहे, असे त्यांनी सांगितले. हाच मुद्दा जयंत पाटील, अजित पवार यांनी उचलून धरला. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या विषयावर मल्लीनाथी केली आहे, म्हणून अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव दिला आहे. तसा ठराव झाला तर पुन्हा स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, असे अजित पवार व जयंत पाटील म्हणाले. त्यास हरकत घेत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा कामकाज पद्धतीनुसार तसा तो सभागृहात चर्चेला घेता येणार नसल्याचे सांगितले. असा कोणताही ठराव मांडायचा असेल तर संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत चर्चेला घ्यावा लागतो. त्यामुळे गटनेत्यांना बोलावून घेऊन अध्यक्षांनी चर्चा करावी असे मुनगंटीवार यांनी सुचविले.