विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 07:35 PM2024-11-20T19:35:26+5:302024-11-20T19:40:04+5:30

लोकसभेतील पिछेहाटीनंतर महायुतीचं विदर्भात कमबॅक पाहायला मिळत आहे.

Maharastra Assembly Election 2024 Exit poll revealed that BJP is getting great success in Vidarbha | विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज

विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज

Vidarbha Exit Poll : महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे.  भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे. अशातच मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेला सर्वात जास्त फटका बसलेल्या विदर्भात भाजपला मोठं यश मिळत असल्याचे एक्झिट पोलमधून समोर आलं आहे.

विदर्भाचा कापूस पट्ट्यातील मतदानावरुन काँग्रेस आणि भाजपचे भवितव्य अवलंबून होते. विदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजही या भागांमध्ये निवडणूक लढवणार होते. देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा नागपूर दक्षिण पश्चिममधून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्या विरोधात तर बावनकुळे काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्या विरोधात लढवत होते. नाना पटोले यांची साकोलीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्याशी लढत पार पडली आहे.

विदर्भात भाजपचे वर्चस्व, एक्झिट पोलचे अंदाज

JVC एक्झिट पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात भाजपला २०-२३ जागा मिळतील, तर काँग्रेसला ११-१४ जागा मिळतील असा अंदाज आहे. विदर्भात भाजपला २८-३६ जागा मिळतील, तर काँग्रेस २१-३१ जागांवर मागे पडण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार दोन्ही भागात भाजपची आघाडी पाहायला मिळणार आहे.

तर Zeenia AI एक्झिट पोलनुसार विदर्भात महायुतीला ३२-३७, महाविकास आघाडीला २४- २९ आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे  लोकसभेतील पिछेहाटीनंतर महायुतीचं विदर्भात कमबॅक पाहायला मिळत आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील भाजपला धक्का बसला होता. विदर्भातील १८ जागांवर भाजपला फटका बसला होता. तर २०१४ मध्ये विदर्भात ६३ पैकी ४५ जागांवर भाजपनं विजय मिळवला होता. 

दरम्यान, इलेक्टोरल एज एक्झिट पोल आकड्यांनुसार भाजपला ७८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १४ आणि शिवसेनेला २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ६०, शरद पवार गटाला यांना ४६ आणि उद्धव ठाकरेंना ४४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर २० जागा या अपक्ष उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Maharastra Assembly Election 2024 Exit poll revealed that BJP is getting great success in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.