शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

नवीन घर घेताय? नवीन घराची नोंदणी करताय? या ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या

By सचिन लुंगसे | Published: January 27, 2023 10:44 AM

महारेराकडून सुरक्षित घर खरेदीसाठी  मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: बहुतेक जण आयुष्यभराची कमाई पणास लावून घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करीत असतात. या व्यवहारात फसवणूक होऊ नये, अडचणीत येऊ नये म्हणून महारेराने अशा घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी 5  मूलभूत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार गुंतवणूक करताना काळजी घेतल्यास सुरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. यात प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे ना ? महारेराच्या  संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे ना ?  घर खरेदीकरार महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे ना ? तुम्ही 10 टक्क्यांपर्यंत  रक्कम देऊन घरखरेदी,घर नोंदणी करीत असल्यास विकासक घर विक्री  करार करतोय ना ? आणि ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत ना ? या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी हे आवश्यक आहे. घर खरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित रहावी यासाठी महारेराने ही मार्गदर्शक तत्वे  नुकतीच जाहीर केलेली आहेत.

प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असेल तर विकासकांना रेरा कायद्यानुसार ग्राहक हिताच्या दृष्टीने अनेक अटींची पूर्तता करावी लागते. विकासकाकडे घर खरेदी, घर नोंदणीपोटी आलेली रक्कम इतरत्र खर्च न होता त्याच प्रकल्पावर खर्च व्हावी यासाठी रेरा नोंदणी क्रमांकनिहाय बँकेत खाते उघडावे लागते. त्या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशांपैकी 70 टक्के रक्कम या प्रकल्पाच्या कामासाठी या खात्यात ठेवावी लागते. विकासाकाला हे पैसे केव्हाही काढता येत नाहीत. त्यासाठी त्याला प्रकल्प अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ आणि सनदी लेखापाल यांच्याकडून कामाच्या टक्केवारीचे आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र घेऊनच त्या प्रमाणात  पैसे काढता येतात. शिवाय विकासकाला दर तीन महिन्याला प्रकल्पस्थितीची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर अध्ययावत करणे बंधनकारक आहे. यात प्रकल्पात काय काम चालू आहे, कसे काम चालू आहे, काम कुठपर्यंत आलेय या बाबी घरखरेदीदारांना घरबसल्या महारेराच्या संकेतस्थळावर पाहता येऊ शकतात.

 विकासकाला घर विक्री कराराआधी 10 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम घेता येत नाही.  विकासक 10% पर्यंत  रक्कम घेऊन घर नोंदणी घेत असेल/ घर विक्री करीत असेल तर विकासकाला घर  विक्री करार करणे बंधनकारक आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे 1 जानेवारीपासून महारेराने नवीन प्रकल्पाच्या नोंदणीसाठी विकासकासोबतच्या सर्व संचालकांचा दिन क्रमांक (  DIN ) याच्यासह या सर्वांच्या इतरही प्रकल्पाची सविस्तर माहिती  या नवीन प्रकल्पाची नोंदणी करताना नोंदवणे आता बंधनकारक आहे.  घर खरेदीदार या सर्व माहितीचा अभ्यास करून , त्या विकासकाच्या क्षमतेची चाचणी करून , सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकतात.

या सर्व प्रक्रियेत विकासकासोबत होणारा घर खरेदीकरार हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज असतो. याबाबतही महारेराने आदर्श खरेदीकरार जाहीर केलेला आहे. त्यात दैवी आपत्ती , चटई क्षेत्र   दोष दायित्व कालावधी आणि प्रकल्प हस्तांतरण करार या बाबी महारेरा कायद्यानुसार आवश्यक असून त्यात विकासकाला कुठलाही बदल करता येत नाही. याशिवाय आदर्श खरेदी करारात खरेदीदाराच्या संमतीने काही बदल करायचे असल्यास विकासक ते करू शकतात.   परंतु खरेदीदाराला ते स्पष्टपणे कळावे यासाठी ते बदल अधोरेखित ( Underline) करणे बंधनकारक केलेले आहे. या करारातच हा  प्रकल्प कधी पूर्ण होणार याची नोंद असते.  त्याची नोंद त्यांना महारेराच्या संकेतस्थळावरही करावी लागते. ज्यांच्या मार्फत आपण हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेराकडे नोंदणीकृत आहेत किंवा नाही, याचीही खात्री गुंतवणूकदाराने करून घ्यायला हवी. महारेराने ठरवून दिलेल्या या सर्व 5  बाबींची काळजी घेऊन गुंतवणूक केल्यास ती गुंतवणूक सुरक्षित राहायला नक्की मदत होणार आहे.

सुरक्षित घर खरेदी / घर नोंदणीसाठी महारेराची पंचसूत्री

  • फक्त महारेराकडील नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक
  • महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची  तारीख आवश्यक
  • महारेराने ठरवून दिलेल्या "आदर्श घर खरेदी करारानुसारच" करार
  • 10 टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घर नोंदणी /घर  खरेदी करत असाल तर विकासकाला घरविक्री करार करणे बंधनकारक
  • महारेराकडे नोंदणीकृत मध्यस्था मार्फतच जागेचा व्यवहार

 

महारेरा नोंदणीकृत प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • आर्थिक शिस्त:  घर खरेदी/ घर नोंदणीपोटी आलेल्या पैशांपैकी 70 टक्के बांधकामासाठीच वापरणे बंधनकारक
  • पारदर्शकता : प्रकल्पाची सविस्तर माहिती महारेरा संकेतस्थळावर
  • प्रकल्पाचा प्रगती अहवाल दर तीन महिन्याला महारेराच्या संकेतस्थळावर नोंदवणे विकासकाला बंधनकारक 
  • प्रकल्पात मोठी वाढ किंवा फेरफार करण्यासाठी 2/3 घर खरेदीदारांची संमती आवश्यक
  • प्रकल्पासंबंधी तक्रार असल्यास महारेराकडे दाद मागण्याची सोय
  • महारेराच्या संकेतस्थळामार्फत घरबसल्या प्रकल्पाचे  संनियंत्रण(Monitoring)शक्य
  • सर्व व्यवहारांसाठी महारेराने ठरवून दिलेल्या चटई क्षेत्राचाच आधार

 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन