नीरा : विश्वाला एकता, समता आणि बंधुभावाचा संदेश देत आषाढी वारीसाठी निघालेला श्री ज्ञानराज माऊलींचा पालखी सोहळा आज गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींची तपोभूमी वाल्हेनगरीत मुक्कामी विसावला. दरम्यान, खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन सोहळ्याने दौंडज खिंडीत न्याहरीचा आनंद लुटला. उद्या शुक्रवारी माऊलींच्या नीरा स्नानानंतर हा सोहळा पुणो जिल्ह्याचा निरोप घेऊन सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
हरिचिया प्रेमे रंगोनिया गेले !
देहीचे विसरले देहभाव !!
श्री ज्ञानराज माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी खंडेरायाच्या जेजुरीनगरीत विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री उशिरार्पयत गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी श्री खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन हा सोहळा वाल्हे मुक्कामी मार्गस्थ झाला. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन ऊन-वा:याचा सामना करीत दिंडय़ा पुढे सरकत होत्या. सकाळच्या न्याहरीसाठी हा सोहळा दौंडज खिंडीत पोहोचला.
घ्यारे भोकरे भाकरी !
दही-भाताची शिदोरी !!
जेजुरीपासून चार कि. मी. अंतरावर दौंडज खिंड आहे. महर्षी वाल्मिकी ऋषींनी रामायण हा रामजन्मापूर्वी ग्रंथ लिहिला, अशी अख्यायिका आहे. दौंडज खिंडीत सात उंच-उंच डोंगर आहेत. एका बाजूला खंडेरायाच पठार आहे. भाविक खंडेरायाचे दर्शन घेऊन कडेपठारला जातात. तेथील दर्शन घेऊन दौंडज खिंडीत सोहळ्यात सहभागी होतात. जेजुरी व दौंडज परिसरातील भाविक वारक:यांच्या न्याहरीसाठी भाकरी, चटणी, डाळ-कांदा, दही, बेसन, लोणचे आदी पदार्थ घेऊन येतात. वारकरी या खिंडीत मोठय़ा आनंदाने या न्याहरीचा आस्वाद घेतात. न्याहरीनंतर हा सोहळा ऊन-वा:याचा सामना करत वाल्हेनगरीत पोहोचला.
पुणो जिल्ह्यातील माऊलींच्या पालखी सोहळ्याचा हा शेवटचा मुक्काम आहे. उद्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. तत्पूर्वी दुपारी माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान
करण्यात येईल.
गुढय़ा - तोरणो उभारून स्वागत
4पूर्वी श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा शिरवळ (जि. सातारा) मार्गे लोणंदला जात होता. नीरा नदीवर पूल नसल्याने हा सोहळा त्यामार्गे जात होता. वाल्हेनगरीतील अभियंता कृष्णा मांडके यांनी स्वखर्चाने नीरा नदीवर पूल बांधला. त्यानंतर हा सोहळा वाल्हेमार्गे लोणंदला जाऊ लागला. वाल्हेनगरीत महर्षी वाल्मीकींची समाधी आहे. या समाधिस्थळावर वारकरी मोठय़ा संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात.
4वाल्हे ग्रामस्थांनी पालखी मार्गावर माऊलींचे भव्य स्वागत केले. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, पोलीस उपअधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, वाल्हेनगरीचे सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपटराव पवार, दत्तात्रय पवार, सूर्यकांत पवार, गिरीश पवार, पोलीस पाटील प्रवीण कुमठेकर यांच्यासह विविध पदाधिका:यांनी आणि ग्रामस्थांनी माऊलींचे आणि सोहळ्याचे स्वागत केले.
4माऊलींच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी घरावर गुढय़ा-तोरणो उभारली होती. रांगोळ्याच्या ठिकठिकाणी पायघडय़ा काढल्या होत्या. वाल्हेनगरीत स्वागत केल्यानंतर माऊलींची पालखी रथातून काढून ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन ग्रामप्रदक्षिणा केली. माऊलींची पालखी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुकलवाडी रस्त्यावरील पालखीतळावर आणण्यात आली. पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असताना वाल्हे येथेच फक्त दुपारी समाजआरती होते. या वेळी समाजआरतीला सोहळ्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. समाज आरतीनंतर हा सोहळा वाल्हे मुक्कामी विसावला.
नीरा स्नानानंतर पालखी सोहळा
सातारा जिल्ह्यात
4पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला विशेष महत्त्व आहे. नीरा नदीच्या पैलतीरावर निसर्गरम्य दत्तघाट परिसरात माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येते. त्यानंतर हा सोहळा पुणो जिल्ह्याचा निरोप घेऊन हैबतबाबांच्या जन्मभूमीत सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो. नीरा स्नानानंतर शुक्रवारी अंदाजे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी एम. एन. एम. राधास्वामी, वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार असल्याचे समजते.
माऊलींचा सोहळा आमची
ऊर्जा : देवेंद्र फडणवीस
माऊलींच्या सोहळ्यात आपण जेजुरी ते वाल्हे असा सहभाग दरवर्षी घेत आहोत. सोहळ्यात अल्पसा का होईना सहभाग माङयासाठी मोठी ऊर्जा देणारा आहे. या वर्षी पावसाने ओढ दिल्याने वारक-यांची संख्या घटली आहे. पाऊस लांबल्याने शासनाकडून पाणी पुरवठयाचे नियोजन आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी संगितले. तर भक्ती ,शक्ती युक्तीचे हे चालते बोलते पीठ असून यात सहभागी झाल्याने स्फूर्ती येत असल्याची भावना विनोद तावडे यांनी व्यक्त केली. पुरंदरच्या भूमीतून हा सोहळा जातो. हे आमचे भाग्य. सोहळ्याला सर्व सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे.सध्या पालखी महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने दुतर्फा असलेली झाडे तोडलेली आहेत. लवकरच शेतक-यांना उपयुक्त उत्पन्न देणारी झाडे लावण्याचा प्रयत्न असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
महायुतीचे नेते वारीत सहभागी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार विजय शिवतारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे, आमदार बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि भाजपाचे विविध पदाधिकारी हे जेजुरी-दौंडज खिंडीपासून आज सकाळी माऊलींच्या पालखी सोहळ्यात टाळाचा गजर आणि विठ्ठलनामाचा जयघोष करत सहभागी झाले होते. वाल्हेनगरीपयर्ंतचा 12 कि.मी. पायी प्रवास महायुतीच्या या नेत्यांनी वारक:यांसमवेत विठुनामामध्ये अगदी आनंदात केला.
सोशल मीडियासंबंधी नवा कडक सायबर कायदा
राज्य सरकारमधील जो तो पैशाचा मागे लागला आहे. राज्य सरकारला वारक:यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही. संत आणि ईश्वरनिंदा विधेयक हा राज्य आणि केंद्रीय गृह खात्याचा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयावर ते अवलंबून आहे. असे सांगून सोशल मीडियासंबंधी नवा कडक सायबर कायदा आणण्याबाबत विचार केला जाणार आहे, अशीही प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.