गणपतीच्या फोटोवर काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचे पोस्टर; भाजपची संतत्प प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 09:01 PM2024-11-14T21:01:49+5:302024-11-14T21:02:36+5:30
Maharsahtra Election 2024: चांदिवली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान वादात सापडले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील अंधेरी पूर्वेतील चांदिवली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान वादात सापडले आहेत. नसीम खान यांचे पोस्टर गणपतीच्या फोटोवर चिकटवण्यात आले आहे. प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असावे, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यावरुन भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.
In an outright insult to the Hindu community in Maharashtra, Congress workers campaigning for Naseem Khan in Chandivali, stuck his poster on Ganpati Bappa’s picture.
— Amit Malviya (@amitmalviya) November 14, 2024
Ganpati Bappa is revered as विघ्नहर्ता and Maharashtrians, among others, have deep emotional attachment to the… pic.twitter.com/Kei7wVoyVG
घराच्या गेटच्या वर असलेल्या टाइल्सवर गणपतीचा फोटो आणि शुभ लाभ लिहिलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या फोटोवर नसीम खान यांचे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. पोस्टर पाहून स्थानिक लोक संतापले आहेत. व्हिडिओमध्ये स्थानिक ‘तो खूप निर्लज्ज आहे’ असे म्हणताना ऐकू येत आहे.
भाजपने केला हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप
यावरुन भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. अमित मालवीय यांनी लिहिले की, "चांदिवलीमध्ये नसीम खान यांचा प्रचार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील हिंदू समाजाचा अपमान करण्यासाठी गणपती बाप्पाच्या चित्रावर उमेदवाराचे पोस्टर लावले. गणपती बाप्पाची विटंबना करण्याचे हे कृत्य पूर्वनियोजित असल्याचे दिसते. फाळणीनंतरचा सर्वात वाईट व्होट जिहाद मुंबईत पाहायला मिळतोय. काँग्रेस ही नवी मुस्लिम लीग आहे," अशी बोचरी टीका मालविय यांनी केली.