लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू होऊन महिना होत असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एम. बी. कॅम्प येथील महात्मा गांधी विद्यालयातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकविण्यासाठी प्रशासनाकडून शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जकात नाकी बंद झाल्याने उपलब्ध ११ शिक्षकांतून इंग्रजी विषयासाठी शिक्षकाची नेमणूक होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.बोर्डाच्या वतीने एम. बी. कॅम्पमध्ये मराठी माध्यमाचे एकमेव महात्मा गांधी विद्यालय चालविण्यात येत आहे. आठवी ते दहावी अशा तीन वर्गात सुमारे १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळेतून वर्ग केलेले चार शिक्षक विद्यालयात विविध विषय शिकवित आहेत. मात्र, इंग्रजीसाठी प्रशासनाने एकही शिक्षक उपलब्ध केला नसल्याची माहिती समोर आली आहे. इंग्रजी विषय सामान्य विद्यार्थ्यांना कठीण जात असल्याचे सर्वत्र बोलले जात असताना एका महिन्यात बोर्डाकडून एकही शिक्षक नेमण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विश्वसनीय माहितीनुसार, जकात नाका बंद झाल्याने नाक्यांवरील ११ शिक्षक उपलब्ध झाले असले तरी कॅन्टोन्मेंटकडून सर्वांना सर्वेक्षणासाठी नेमले आहे. ‘एलकेजी’ शाळाही शिक्षकांविनाचचालू शैक्षणिक वर्षांपासून चिंचोली, किन्हई, शेलारवाडी व एमबी कॅम्प येथे इंग्रजी माध्यमाच्या बालवाडीचे (एलकेजी) वर्ग सुरू करण्याबाबत बोर्डाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर संबंधित भागात जाहिराती लावण्यात आल्या होत्या. मात्र, देहूरोड परिसरातील खासगी शाळांतील एलकेजीची प्रवेश प्रक्रिया जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण झाल्याने खूप कमी प्रतिसाद मिळाला.
महात्मा गांधी विद्यालय इंग्रजी शिक्षकांविना
By admin | Published: July 14, 2017 1:41 AM