शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महात्मा गांधींची हत्या ही गोडसेंची चूक

By admin | Published: May 21, 2017 1:58 AM

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करुन चूक केली, अशा आशयाचे विधान हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी शनिवारी ‘लोकमत’कडे केले. अखंड भारताच्या विभाजनापासून अनेक समस्यांचे मूळ गांधी नव्हे तर पं. जवाहरलाल नेहरु होते व गोडसे यांना याचे आकलन न झाल्याने त्यांनी मूळावर घाव घातला नाही, असा दावाही जोशी यांनी केला. अखंड भारताचे विभाजन करण्यामागे पं. जवाहरलाल नेहरु यांना गोवळलकर गुरुजींची साथ होती. त्यामुळेच १९४६ ला हिंदू महासभा पराभूत झाली. नेहरु हे सत्तापिपासू होते व म. गांधी यांना पुढे करुन त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना बाजूला केले. हे त्या वेळच्या पत्रव्यवहारांवरुन स्पष्ट होते, असे जोशी म्हणाले.रत्नागिरीत १९२६ मध्ये स्वा. सावरकर आणि गांधींची भेट झाली तेव्हा सावरकरांनी गांधीजींना ‘महात्मा’ अशी उपाधी दिली. तोपर्यंत त्यांना कोणीही ‘महात्मा’ म्हटले नव्हते. रोलॅक्ट अ‍ॅक्ट हा काळा कायदा आला तेव्हा त्यास विरोध करताना महात्मा गांधी हे १९२० पर्यंत हिंदुमहासभेसोबतच होते, तेव्हा त्यांनी त्या कायद्याविरोधात राष्ट्रीय जनजागरण केले होते. तसेच चंपारण्य आंदोलनाध्येही ते महासभेसोबतच होते, असे जोशी म्हणाले.जवाहरलाल नेहरु यांनी के.आर. दास यांच्या सहकार्याने गांधींवर दबाव आणून त्यांना बाजूला केले व हिंदू महासभेचे प्रमुख विरोधक म्हणून पुढे आणले. गोवळलकर गुरुजींची साथ नेहरुंना नसती तर त्याकाळात काँग्रेस सत्तेत आलीच नसती, असेही जोशी यांचे म्हणणे होते. कल्याणमध्येही नथुरामचे स्मारककल्याणपासून ६ किमी अंतरावर असलेल्या सापाड गावात नथुराम गोडसेंचे स्मारक उभारण्यात येत आहे. एकूण ३ गुंठ्यांच्या जागेत ८ बाय ६ च्या खोलीत गोडसेंची मूर्ती बसवण्यात येणार असून अन्य जागेत गोशाळा, वाचनालय आणि जोशी कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. यासाठी सुमारे १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तो निधी कोणाकडूनही जमा करणार नाही. गोडसेंची ३ टन वजनाची मूर्ती राजस्थानमधील किसनगढ येथे तयार होत असून केवळ दळणवळणाच्या काही अडचणी आहेत, त्या मार्गी लागल्या की, वर्षभरात हे स्मारक पूर्ण होईल, असे जोशी म्हणाले. देशभरात गोडसेंची सध्या दोन ठिकाणी स्मारके असून एक दिल्लीत, तर दुसरे मेरठ येथे आहे. आता हे तिसरे सापडमध्ये असेल असा दावा जोशी यांनी केला.