शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम करतंय : देवेंद्र फडणवीसांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 2:50 PM

आमच्या काळात शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आले तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचे बोलले होते. त्यावेळी नुकसान झालेल्या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा देखील घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्र्यांच्याही पुढे गेले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपयांची मदत देऊ असे घोषित केले होते. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.याचमुळे  महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे , अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन सुरु असताना राज्यात भाजपाकडून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर  देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील मांजरीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांची माहिती देत त्याचे महत्व पटवून दिले. 

फडणवीस म्हणाले, 'आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावे ठेवत राज्य सरकारने कर्जमाफीची योजना तयार केली. पण त्याचा फारसा उपयोग शेतकऱ्याला झालेला नाही. मात्र आमच्या काळात जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा जवळपास ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला. 

आमच्या काळात शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आले तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्याचा विचार कऱणारे,त्यांची भूमिका मांडणारे असे कुणीही दिसत नाही. भाजपाने मागील पाच वर्षात सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते, असहा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

यामुळे फडणवीसांनी व्यक्त संताप...  शेतकऱ्यांना सहा आणि आठ हजार रुपये घोषित केले आणि तेदेखील पोहोचले नाही. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे,” असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवार