मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर शिवसेना(उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले, आज काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) पक्षांची बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, मी आणि विनायक राऊत बैठकीला उपस्थित होतो. आजच्या बैठकीत आज बरेच निर्णय झाले, मुख्यत्त्वे आज महाविकास आघाडीचा विस्तार झालेला आहे.
सीपीआयएम, सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल युनायडेट, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, शेकाप या सगळ्यांचा आज महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला आहे. आम्हाला नवीन मित्र मिळाले आहेत. या सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली. महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.