मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी पार पडत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या नाव जवळपास निश्चित झाले असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे भुमरे यांना सकाळीच 'मातोश्री'वरून शपथविधीसाठी हजर राहण्याचे निरोप मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आमदार भूमरेंचे नाव स्त्तास्थापेनच्या पहिल्या दिवसापासून आघाडीवर होते. गेल्यावेळी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांना युती सरकाच्या काळात मंत्रीपदाची संधी शेवटपर्यंत मिळाली नाही. मात्र असे असताना सुद्धा त्यांनी पक्षावर निष्ठा कायम ठेवली आणि विधानसभा निवडणुकीत विजय सुद्धा मिळवला. त्यामुळे त्यांची मंत्रीपदी लागेली वर्णी म्हणजे त्यांच्या एकनिष्ठच फळ असल्याची चर्चा औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
कोण आहे संदीपान भुमरे
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पैठण विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली पहिल्यांदा निवडून आलेले संदीपान भुमरेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवला आहे. शिवसेनेकडून पाचवेळा निवडून येणारे ते सद्याच्या आमदारांमध्ये एकमेव आमदार आहेत. त्यामुळे मंत्रीपदावर त्यांचा नैसर्गिक अधिकार असल्याचा दावा भुमरे समर्थकांकडून करण्यात येत होता. तसेच एकनिष्ठपणाचे त्यांना आज फल मिळाले असल्याचे बोलले जात आहे.