शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Video : "... ही गुंडगिरी खपवून घेणार नाही"; नवाब मलिक यांनी शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 5:08 PM

Maharashtra Assembly 2021 : विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करतेय हे लोकशाहीला घातक : नवाब मलिक.

ठळक मुद्दे विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करतेय हे लोकशाहीला घातक : नवाब मलिक.या गोष्टी घडताना फडणवीस याचं नेतृत्व करत होते गे दुर्देवी, मलिक यांचं वक्तव्य.

"जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले असून बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय. मात्र कधी याला तुरुंगात टाकतो तर कधी त्याला तुरुंगात टाकू अशा धमक्या द्यायच्या. आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या व मारामारी करण्याचे काम भाजप करतेय हे लोकशाहीला घातक असून ही गुंडगिरी खपवून घेणार नाही," असा इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान, मलिक यांनी तालिका अध्यक्षांच्या केबिनमध्ये झालेल्या गोंधळाचा एक व्हिडीओदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. आणि विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला. "विधानसभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून इम्पिरियल डाटा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर विरोधी पक्षाने हरकत उपस्थित केली. त्यामुळे पीठासीन अधिकार्‍यांनी बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुद्देसूद जो घटनाक्रम होता त्याची माहिती दिली. त्यावेळी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतास टाकल्यानंतर भाजपचे बरेच आमदार पीठासीन अधिकार्‍यांच्या टेबलकडे गेले. त्यांचा माईक उचलला, राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय धक्काबुक्कीही केली. यापेक्षा भयानक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा माईक आणि स्पीकर फोडला," असेही नवाब मलिक म्हणाले.आमदारांनी अध्यक्षांना घेरलं"अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन भाजपच्या सगळ्या आमदारांनी त्यांना घेरलं. धक्काबुक्की केली, आईबहिणीवरुन शिवीगाळही केली, अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती. भाजपवाल्यांना आता गुंडगिरी करून विधानसभेचे कामकाज थांबवायचे असेल तर ते आघाडी सरकार कधीही खपवून घेणार नाही," अशा स्पष्ट शब्दात मलिक यांनी भाजपला इशारा दिला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाBhaskar Jadhavभास्कर जाधवMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस