- अतुल जयस्वाल, अकोला
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महावितरणची चार प्रादेशिक कार्यालये अखेर २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी कार्यान्वित होणार आहेत. स्थानिक पातळीवरील निर्णय घेणे व प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने औरंगाबाद, पुणे, कल्याण व नागपूर येथे स्थापन करण्यात येणार असलेल्या या कार्यालयांची जबाबदारी विभागीय संचालकांवर राहील. सध्या मुंबई येथील ‘प्रकाशगड’ या मुख्यालयावर राज्यभरातील कामकाजाचा भार वाढत असल्याने महावितरण प्रशासनाने औरंगाबाद, पुणे, कल्याण व नागपूर येथे प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर विभागाचे प्रमुख प्रसाद रेशमेनागपूर व पुणे येथील कार्यालयांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नागपूरचे विभागीय संचालक म्हणून प्रसाद रेशमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशी आहे रचनाप्रादेशिकअंतर्गत मोडणारेकार्यालयपरिमंडळनागपूरनागपूर, चंद्रपूर,गोंदिया, अकोला वअमरावतीऔरंगाबादऔरंगाबाद, लातूर,नांदेड व जळगाव.पुणेपुणे, बारामती वकोल्हापूर कल्याणभांडुप, कल्याण,नाशिक वरत्नागिरी