महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:51 PM2024-10-11T17:51:58+5:302024-10-11T17:53:22+5:30

Mahayuti Seat Sharing, Maharashtra Assembly Election 2024: राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. यासंदर्भात सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत

Mahayuti Seat sharing almost done who will declare names list first BJP chief Chandrashekhar Bawankule gives major update Maharashtra politics assembly election 2024 | महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट

महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट

Mahayuti Seat Sharing, Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा हा चर्चेचा विषय आहे. निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात राज्यातील विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली आणि आढावा घेतला. आता लवकरच महाराष्ट्रात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि मनसे हे स्वतंत्र लढणार आहेत. तर महाविकास आघाडी आणि महायुती हे आपापल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन लढणार आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे महायुतीकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. याचसंदर्भात आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

जागावाटप कुठपर्यंत आलंय?

जागावाटपावर गेल्या काही दिवसांपासून महायुतीची चर्चा सुरु आहे. त्यापैकी आता ९० टक्के जागावाटप पूर्ण झाले असल्याचे बावनकुळे म्हणाले. पुढील २ ते ३ दिवसांमध्ये १० टक्के जागावाटप पूर्ण केले जाणार आहे. मागच्या वेळी भाजपाने विदर्भात जास्त जागा लढवल्या होत्या, तसेच यावेळीही भाजपा जास्त जागा लढवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोण कधी उमेदवार जाहीर करणार?

१३ ऑक्टोबरला भाजपाच्या राज्याच्या संसदीय समितीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये पुढील चर्चा केली जाईल आणि मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल, असेही त्यांनी सांगितले. महायुतीच्या विविध स्तरावरील चर्चा आणि बैठकांचे सत्र पूर्ण झाले की मग सर्वप्रथम महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेनेच्या कोट्यातील जागांवरील उमेदवार घोषित करतील. त्यानंतर महायुतीतील दुसरा महत्त्वाचा घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या जागेवरील उमेदवार घोषित करतील, अशी महत्त्वाची अपडेट बावनकुळेंनी दिली.

Web Title: Mahayuti Seat sharing almost done who will declare names list first BJP chief Chandrashekhar Bawankule gives major update Maharashtra politics assembly election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.