जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपाचा राजकीय आलेख मोठय़ा प्रमाणात वर गेला. परंतु राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारविरुद्ध निर्णायक आघाडी घेण्यासाठी महायुतीतील सर्वात जुना सहकारी शिवसेना आणि नव्या मित्र पक्षांमध्ये समझोता आणि जागांचे सम्यक वाटप होणो आवश्यक आहे, असे मत भाजपाचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथुर यांनी व्यक्त केले आहे.
भाजपाने विधानसभेच्या निम्म्या जागा लढविल्या पाहिजे, या भाजपाच्या काही नेत्यांच्या सूचनेवर माथुर यांनी असहमती दर्शविली. जोर्पयत एखादा औपचारिक समझोता होत नाही तोर्पयत भाजपा वा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने दोन्ही जुन्या सहकारी पक्षांच्या संबंधात कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये, असा सल्ला माथुर यांनी दिला.
भाजपा अध्यक्ष अमित शहा हे मुंबईला रवाना होण्याच्या एक दिवसाआधी लोकमतशी बोलताना माथुर म्हणाले, निवडणुकीपूर्वीच कुणाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याला आपला विरोध आहे.
जागा वाटपावरून शिवसेना-भाजपा आणि रिपाइं नेत्यांनी केलेल्या दाव्यांबाबत विचारले असता ते म्हणाले, अद्याप जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांची औपचारिक बैठक सुरू झालेली नाही. अशा अनेक गोष्टी पुढे येत राहतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 119 जागांवर निवडणूक लढविली होती. यावेळी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिव संग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीत सामील झालेल्या पक्षांसाठीही 18 ते 2क् जागा सोडाव्याच लागतील. या जागा भाजपा आणि शिवसेनेच्याच कोटय़ातून द्याव्या लागतील, हे उघड आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेना यांच्यात केवळ 27क् जागांमध्येच वाटप करावे लागेल.
केवळ मोदी लाटेमुळेच संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात भाजपाचा राजकीय आलेख बराच उंचावलेला आहे आणि शिवसेनेजवळ आता बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नेतृत्वही राहिलेले नाही, ही बाब शिवसेना नेतृत्वाने लक्षात घेतली पाहिजे. दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही प्रकारचा वाद वा कटुता नुकसानदायक ठरेल, हे भाजपाच्या नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे. जागा वाटपाच्या मुद्यावरून महायुती संपुष्टात येणार नाही. कारण आमचे ध्येय एक आहे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कुशासनापासून मुक्ती.
माथुर हे गुजरातचेही भाजपा प्रभारी आहेत. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी बनल्यानंतर त्यांनी 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर्पयत राज्याचा दौरा केला आणि प्रदेश निवडणूक समिती, विधानसभा मतदारसंघातील पक्ष निरीक्षक आणि प्रदेश भाजपा कोर ग्रुपची बैठक घेतली.
च्शहा-ठाकरे भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी केला. युती अभेद्य असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चेचा अधिक तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.
शहा-ठाकरेंची रणनीतीवर चर्चा
च्भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणूक रणनीतीबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवरून दूर करण्याकरिता युतीच्या कार्यकत्र्यानी गाफील न राहता प्रयत्न करण्याचे उभय नेत्यांमध्ये ठरले.
च्शहा यांच्या मातोश्री भेटीवरून गेले काही दिवस वादंग सुरू होते. मात्र अखेर शिवसेनेने दोन पावले माघार घेत शहा यांना मातोश्री भेटीचे निमंत्रण दिले. त्यानुसार शहा मातोश्रीवर दाखल झाले.
च्तत्पूर्वी शहा यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण करून मातोश्रीवर जाण्यावरून युतीमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच षण्मुखानंद सभागृहातील आपल्या भाषणात महाराष्ट्र ही बाळासाहेब ठाकरे यांची कर्मभूमी असल्याचा आवजरून उल्लेख केला.
च्राज्यात सत्ता आणण्याकरिता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करणो कसे गरजेचे आहे, जागावाटपातील काही अडथळे दूर करण्याकरिता काय करता येईल आणि कोणते मुद्दे घेऊन संयुक्तपणो प्रचार करता येईल आदी मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा झाली.
प्रचाराला प्रारंभ मुंबईतून
गुरुवारी सकाळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत महायुतीच्या प्रचाराचा आरंभ मुंबईतील सभेद्वारा होईल, असा निर्णय घेण्यात आला. सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच स्वत: शहा येतील. मात्र मोदी येऊ शकले नाहीत तरी प्रचाराच्या समारोपासाठी कुठल्याही परिस्थितीत मोदींची सभा आयोजित करण्यात येईल. ‘आघाडीमुक्त महाराष्ट्र’ हा प्रचाराचा गाभा राहणार आहे, असे सांगण्यात आले.
खतगावकर,
पाचपुते भाजपात
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, सूर्यकांता पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ. माधव किन्हाळकर, रमेश आडस्कर, दत्ताभाऊ पाथ्रीकर आणि अजयसिंह बिसेन आदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.