शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

मुंबईत महिलाराज!

By admin | Published: February 17, 2017 2:42 AM

आरक्षणाने महापालिकेतील ११४ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या. त्यात खुल्या प्रवर्गातूनही सुमारे ६० टक्के महिलांना उमेदवारी मिळाली आहे

शेफाली परब-पंडित / मुंबईआरक्षणाने महापालिकेतील ११४ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या. त्यात खुल्या प्रवर्गातूनही सुमारे ६० टक्के महिलांना उमेदवारी मिळाली आहे. विजयासाठी आव्हानात्मक व अटीतटीच्या अशा खुल्या प्रभागांतही राजकीय पक्षांनी महिला उमेदवारांना महत्त्व दिलेले आहे. यामुळे राजकारणातील महिलांची ताकद वाढल्याचेच चित्र आहे. पर्यायाने महापालिकेच्या नव्या टीममध्ये सत्ताकेंद्र महिलांच्या हाती असण्याची चिन्हे आहेत.२०१२च्या महापालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. यामुळे ११४ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या, तरीही सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या प्रवर्गातही महिलांना उमेदवारी दिली. यामुळे १०६ नगरसेवक, तर १२१ नगरसेविका निवडून आल्या. या वेळेस आरक्षित प्रभागांतून १,०८६ महिला उमेदवार असून, ८० खुल्या प्रभागांतूनही महिलांना उमेदवारी मिळाली आहे. प्रमुखपदही महिलांकडेच...२०१२ मध्ये महापालिकेत १२१ नगरसेविका निवडून आल्याने सभागृहातील त्यांचे वजनही वाढले. त्यामुळे राजकीय पक्षांकडूनही महिलांना प्रमुखपदे देण्यात येऊ लागली. यापैकी आरक्षणामुळे महापौरपद अडीच वर्षे नगरसेविकेकडेच होते. तर उपमहापौरपदावरही भाजपाने नगरसेविकेलाच प्राधान्य दिले. एवढेच नव्हे, तर सभागृह नेतेपद पहिल्यांदाच महिलेकडे आले. कामगिरीबाबत साशंकता...नळाच्या पाण्यापासून अंगणातल्या स्वच्छतेपर्यंत महिला जागरूक असते. त्यामुळे जनतेला भेडसावत असलेल्या छोट्या-छोट्या नागरी समस्यांना नगरसेविका न्याय देतील, अशी अपेक्षा होती. यापैकी काहींनी चमक दाखविलीही. सभागृहातील चर्चेत, प्रश्नोत्तरांमध्ये महिलांनी पुढाकार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी असंख्य हरकतीच्या मुद्द्यांनी प्रशासनाला धारेवर धरले, तर शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी पालिकेतील पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले. प्रजा फाउंडेशनच्या पाहणी अहवालात महिलाच सरस ठरल्या. मात्र, शेवटच्या दोन वर्षांत महिलांची टीम ढेपाळली. त्यामुळे महिलांच्या एकूण कामगिरीबाबत साशंकताच आहे.खुल्या प्रवर्गातील महिलांची उमेदवारी११३ पैकी ८० खुल्या प्रभागात महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी ३४ महिला घराणेशाही अथवा राजकारणात सक्रिय असलेल्या आहेत. महिलांसाठी नव्हे, तर मागासवर्गीयांसाठी आरक्षण असलेल्या ३० पैकी १८, अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव असलेल्या आठपैकी सहा तर कोणतेही आरक्षण नसलेल्या ७५ खुल्या प्रभागांतून २० महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेकडून १२ भाजपा व काँग्रेस प्रत्येकी पाच, मनसेमधून चार, तर राष्ट्रवादीकडून सात खुल्या प्रभागांमध्ये महिलांना उमेदवारी मिळाली आहे.२०१२ मध्ये २२७ पैकी १०६ पुरुष तर १२१ महिला नगरसेवक/नगरसेविका पदावर निवडून आले होते. यापैकी ९८ नगरसेविका पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. या वेळेस ३३ विद्यमान नगरसेविकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अनुभवी व आक्रमक महिला टीम येतेय...२०१२ मध्ये आरक्षणाचा थोडा फटका नगरसेविकांनाही बसला. काही दिग्गज नगरसेविकांना अन्य प्रभागांतून निवडणूक लढावावी लागल्यामुळे त्यांचा पराभव झाला. मात्र, या अनुभवी व आक्रमक महिला पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. शिवसेनेतून अशा माजी नगरसेविकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये राजुल पटेल, शुभदा गुडेकर आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचा समावेश आहे. खुल्या प्रभागात जुन्यांना प्राधान्यराजकीय क्षेत्रात पतीच्या पावलांवर पाऊल ठेवत आलेल्या काही नगरसेविका राजकारणात रस घेऊ लागल्या. त्यांची कामगिरी व त्यांच्या नावापुढे असलेले वलय, यामुळे त्यांचा प्रभाग खुला झाल्यानंतरही पतीऐवजी त्याच मैदानात उतरल्या आहेत. यामध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या नगरसेविका रिद्धी खुरसुंगे यांना संधी दिली आहे. त्यांचे पती भास्कर खुरसुंगे माजी नगरसेवक आहेत, तसेच कुर्ल्यातून मनाली तुळसकर, दर्शना शिंदे या नगरसेविका शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसमधून स्नेहा झगडे, मनसेतून अनिषा माजगावकर, वैष्णवी सरफरे, भाजपातून ज्योती अळवणी, लीना शुक्ला, उपमहापौर अलका केरकर, राजश्री शिरवाडकर व रितू तावडे यांना खुल्या प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.घराणेशाहीने आणले रिंगणातआरक्षणाने अनेक दिग्गज नगरसेवकांना गारद केले. त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने, पाच वर्षांसाठी घरी बसण्याची वेळ अनेकांवर आली. यावर उपाय म्हणून आरक्षणाच्या ठिकाणी आपल्या घरातील महिलेला निवडणुकीच्या मैदानात उतरवून, आपला हक्का त्या जागेवर कायम ठेवण्याची खेळी नगरसेवकांनी केली. या वेळेसही त्यातून वेगळे चित्र नाही. पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी नगरसेवकांनी बंडखोरी करून प्रतिस्पर्धी पक्षाची वाट धरल्याचेही या वेळी दिसून आले. शिवसेनेतून नाना आंबोले, दिनेश पांचाळ, मनसेचे चेतन कदम आदी अशी उदाहरणे आहेत.