पालघर : नगरपरिषदेअंतर्गत लोकमान्य नगर ते विष्णूनगर कडे जाणाऱ्या गटाराच्या बांधकामापोटी चार लाखाच्या अदा करण्यात आलेल्या बिलाचा शितल कंस्ट्रक्शन या नोंदणीकृत ठेकेदाराचा काहीही संबंध नसल्याचे मालक प्रसाद घरत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रार पत्रात लिहिलेले आहे. या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अतुल पाठक यांचे नाव हया प्रकरणी समोर आल्याने त्यांच्या नगरसेवक पदावर गदा येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाले आहे. पालघर नगरपरिषदेने लोकमान्य पाडा शाळा ते विष्णूनगर येथील गटार बांधकामासाठी चार लाख ९ हजार ५६१ इतकी रक्कम ६ मे २०१४ रोजी अदा केली होती. डिसेंबर २००९ मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या हया निवेदेला जानेवारी २०१० मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०११ मध्ये या कामाचे आदेश होऊन ३ मे ते ९ मे हया सहा दिवसात हे काम पुर्ण झाल्याचे कागदपत्रावरून दिसत आहे.या कामाच्या चाचणी अहवालासाठी १९ सप्टेंबर २०११ रोजी पत्र पाठविण्यात आले असुन या काळात बारी हे अभियंता म्हणून काम करीत असताना त्या काळी नगरपरिषदेमध्ये सेवेत नसलेल्या पण आता सेवेत असलेल्या पी. मिश्रा यांची पत्रावर सही असल्याचे आढळून आल्याने या गटाराचे अदा करण्यात आलेल्या बिलाचे अनेकांचे हात आले झाल्याचे आढळून येत आहे.जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना शितल कंस्ट्रक्शनचे मालक ठेकेदार प्रसाद घरत यांनी तक्रार पत्र लिहुन सदर कामाची निवीदा, इसारा व अनामत रक्कम आपण भरलेलीच नसल्याचे कळविले आहे. तसेच आपण हया पूर्वी नगरपरिषदेच्या कामाच्या निवीदेच्या संचीकेकडुन माझ्या नोंदणीपत्र घेऊन विद्यमान शिवसेनेचे नगरसेवक अतुल पाठक यांनी गटार बांधकामाची निविदा प्राप्त करून घेवून अन्य व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या घेत इसार रक्कम व सुरक्षा रक्कम भरून माझ्या उपरोक्त ही निविदा भरल्याचा आरोप घरत यांनी केला आहे. पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सन २०११ मधील लोकमान्य नगर येथील तथाकथील गटार बांधकामापोटी चार लाखाचे अदा केलेले बिल संशयाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच हे काम ज्या ठेकेदाराने केल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे. त्यामध्ये शितल कंस्ट्रक्शनच्या ठेकेदाराने आपण या कामासाठी निवीदाच भरली नसल्याचे व आपण हे काम केलेच नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लिहीलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)अशी ही बोगसगिरी...या कामापोटी देयक मंजुर झाल्यानंतर धनादेशाव्दारे माझ्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम अतुल पाठक यांना काढुन दिल्याची कबुलीही शितल कंस्ट्रक्शनने पत्राद्वारे दिली आहे. गटार बांधकामासाठी भरलेल्या निवीदा फॉर्मवर माझी सही नसताना व हा कामासाठी मी इसारा व सुरक्षा अनामत ही भरलेली नसताना माझ्या नावाने फॉर्म भरून त्यापोटी बिले काढले ही गंभीर बाब असुन याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गटाराच्या बिलाने नगरसेवकावर गदा
By admin | Published: May 21, 2016 4:01 AM