शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

ऊस उत्पादकांच्या खिशावर वाहतूक खर्चाचा भार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:00 AM

शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यापर्यंत ऊस वाहतूक आणि तोडणीचा भार हा संबंधित शेतकऱ्यांवर टाकला जातो.

ठळक मुद्दे राज्यातील असमानता कायम : ४४ कारखान्यांनी कापले सातशेच्यावर रक्कमउसाच्या रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) त्याची रक्कम वजा करुन एफआरपी

पुणे : ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चातील (एच अ‍ॅण्ड टी) राज्यातील असमानता कायम असून, पावणेपाचशे ते नऊशे दरम्यान वाहतूक-तोडणी खर्चाची रक्कम शेतकऱ्यांच्या खिशातून कापली जात आहे. तोडणी-वाहतुक खर्चात एकसमानता नसल्याने काही शेतकऱ्यांना वाहतूक खर्चाचा अधिक भार सोसावा लागत आहे. राज्यातील तब्बल ४४ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन सातशे रुपयांहून अधिक रक्कम कापली आहे. राज्यातील १९५ कारखाने ऊस गाळप हंगामात सहभागी झाले होते. प्रत्येक कारखाना साधारण परिघातील २५ किलोमीटर अंतराहून ऊस गाळपासाठी आणत असतो. शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यापर्यंत ऊस वाहतूक आणि तोडणीचा भार हा संबंधित शेतकऱ्यांवर टाकला जातो. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरातून (एफआरपी) त्याची रक्कम वजा करुन एफआरपी दिली जाते. गेल्यावर्षीपर्यंत काही कारखाने अकराशे रुपयांची रक्कम देखील ऊस तोडणीच्या रुपात कापून घेत होती. त्याची ओरड झाल्यानंतर ‘एच अ‍ॅण्ड टी’चा दर ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर अजूनही निर्णय न झाल्याने प्रत्येक कारखाने आपापल्या सोयीने वाहतूक खर्च एफआरपीतून कापत आहेत. राज्यातील १९५ पैकी ४४ कारखाने ७०० रुपयांच्या वर वाहतूक-तोडणी खर्च कापत असून, त्यातील १५ कारखान्यांनी ८०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम कापलेली आहे. तर, उर्वरीत कारखान्यांचा खर्च हा पाचशे ते ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. सांगलीच्या एच. के. अहिर कारखान्याने सर्वात कमी ४९३ रुपयांची कपात वाहतूक तोडणी खर्चापोटी केली आहे. तर, त्या खालोखाल पुण्याच्या छत्रपती कारखान्याने ५०१.८९ रुपये कापलेले आहेत. म्हणजेच बहुतांश कारखान्यांना वाहतूक-तोडणी खर्च ५०० ते ७०० रुपयांदरम्यान राखणे शक्य झाले असताना काही कारखानांना अधिक खर्च कसा येत आहे, हा प्रश्न अजूनही कायम आहे. ----------------------

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकºयांना सर्वाधिक फटका

साखर उताऱ्यानुसार एफआरपीची रक्कम ठरते. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश कारखान्यांचा सरासरी साखर उतारा साडेआठ ते अकरा टक्के इतका आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देखील तुलनेने कमी मिळते. त्यातच वाहतूक आणि तोडणी खर्च आकरणाऱ्या ४४ कारखान्यांपैकी २४ कारखाने हे विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत.  त्यावर वाहतूक-तोडणी खर्च सातशे आणि आठशे रुपये प्रति टन असल्याने त्या प्रमाणात एफआरपीची रक्कम येथील शेतकºयांना कमी मिळते. -------------------------

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने