नाशिक : शहर व परिसरातील पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पाेलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी खांदेपालट करत पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यांच्या कारभाराची सूत्रे यशस्वीरीत्या पार पाडण्याची संधी दिली आहे. यामुळे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपुढे त्यांच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याची सूत्रे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे तर भद्रकालीची धुरा संभाजी निंबाळकर यांना सोपविण्यात आली आहे. सरकारवाड्याचे हेमंत सोमवंशी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्तपदी सुनील जाधव यांना संधी देण्यात आली असून, गंगापूरचे अंचल मुदगल यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर सरकारवाड्याचे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील कायदासुव्यवस्था राखण्यासाठी जनहितार्थ व प्रशासकीय गरजेनुसार राज्य पोलीस कायद्यानुसार पोलीस निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली आहे. तत्पूर्वी आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या दालनात गेल्या पाच व सहा तारखेला पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आस्थापना मंडळाच्या उपस्थितीत पार पडल्या होत्या. दरम्यान, कोणत्या पोलीस निरीक्षकांना कुठे पदोन्नती दिली जाते, याविषयीची उत्सुकता ताणली गेली होती. पाण्डेय यांनी पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना प्राधान्यक्रमाने संधी देत विविध पोलीस ठाण्यांचा कारभार सोपविला आहे. यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी कितपत नियंत्रणात येईल, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
...पोलीस ठाण्यांना मिळालेले नवीन अधिकारी असे... (कंसात पूर्वीचे ठिकाण)
म्हसरूळ- भारतकुमार सूर्यवंशी (वाहतूक शाखा)मुंबई नाका - भगीरथ देशमुख (नियंत्रण कक्ष)
इंदिरानगर- श्रीपाद परोपकारी (सायबर पो. ठाणे)नाशिकरोड- अनिल शिंदे (उपनगर पो. ठाणे)
उपनगर- नीलेश माईनकर (इंदिरानगर)साजन सोनवणे- शहर वाहतूक शाखा (भद्रकाली)
विजय ढमाळ - गुन्हे शाखा-१ (मुंबईनाका)आनंदा वाघ - गुन्हे शाखा-२ (युनिट-१)
कुंदन जाधव- मध्यवर्ती गुन्हे शाखा (उपनगर)अंचल मुदगल- मध्यवर्ती गुन्हे शाखा (गंगापूर)
महेंद्र चव्हाण- सायबर पोलीस ठाणेसूरज बिजली- सायबर पोलीस ठाणे (ना.रोड)
देवराज बोरसे- शहर वाहतूक शाखा (सायबर पोलीस ठाणे)हेमंत सोमवंशी- दहशतवादविरोधी सेल (सरकारवाडा)