- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मासिक २५ हजार रुपये मानधन मिळेल. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन २००८ मध्ये तर इतर महापालिकांतील नगरसेवकांचे मानधन हे २०१० मध्ये निश्चित करण्यात आले होते. शनिवारी त्यात वाढ करण्यात आली. वाढत्या महागाईचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. - मुंबईच्या नगरसेवकांचे मानधन वाढून अडीच पट झाले आहे. अ वर्ग महापालिकांतील मानधन वाढून सुमारे पावणेतीन पट झाले आहे. ब, क आणि ड वर्ग पालिकांमधील नगरसेवकांच्या मानधन वाढून दुप्पट झाले आहे. नगरसेवकांचे मानधन ...अ+ : मुंबईआधीचे आताचे १०,००० २५,०००अ वर्ग : नागपूर, पुणे आधीचे आताचे ७,५००२०,०००ब वर्ग : पिंपरी, ठाणे, नाशिक आधीचे आताचे ७,५०० १५,०००क व ड वर्ग : अन्य सर्व महापालिका आधीचे आताचे ७,५०० १०,०००