शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा- खा. अशोकराव चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 5:08 PM

काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.

नांदेड - काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. १ व २ मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तरोडा येथील भवानी चौकात रविवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप, मा. आ. कल्याण काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय देशमुख लहानकर, संतोष पांडागळे व दोन्ही प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, शहराचा विकास काँग्रेसच्या कार्यकाळातच झाला आहे. गुरु-ता-गद्दी तसेच नांदेड शहराचा जेएनयूआरएम योजनेत समावेश झाल्याने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अडीच हजार कोटींचा निधी दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरातील बाह्य वळण रस्ते, उड्डाणपूल, जलकुंभ, स्टेडियम, विमानतळ, झोपडपट्टी वासियांना पक्की घरे यासह अन्य विकासकामे करण्यात आली. यामुळे शहराचा ख-या अर्थाने विकास झाला आहे.भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात शहरासाठी कोणताही विकास निधी दिला नाही. स्मार्ट सिटी योजनेचे निकष पूर्ण केल्यानंतर नांदेड शहराचा या योजनेत समावेश केला नाही. या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या निवडणुकीत मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली मात्र गेल्या दोन वर्षात फक्त सहा लाख युवकांनाच रोजगार मिळाला. नोटाबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला असून, अनेकांचा रांगेत मृत्यू झाला. रेशनिंगवर मिळणारी साखर भाजप सरकारने बंद केली. गोरक्षणाच्या नावाखाली दलित अल्पसंख्याक समाजाच्या लोकांच्या हत्या सुरू आहेत. या सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून, भाजपा सरकारच्या परतीच्या प्रवासास नांदेडातून सुरुवात करा असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी मतदारांना केले.   यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड,  माजी मंत्री रमेश बागवे, आ. डी. पी. सावंत, आ. भाई जगताप मा. आ. कल्याण काळे, यांनीही भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली काँग्रेस तसेच खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वातच नांदेडचा विकास होऊ शकतो यासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. या प्रचारसभेस प्रभाग क्र.१ व २ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण