शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

मेक इन इंडियाचं 'Joke In India' झालं; मुख्यमंत्री KCR यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 6:48 PM

जर मोदी सरकारनं LIC खासगीकरण केले तर आम्ही पुन्हा सरकारी करू असंही मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. 

नांदेड - देशाची आर्थिक नीती बदलली नाही तर मनमानीच सुरू राहील. मेक इन इंडियाचं जोक इन इंडिया झालं. किती रोजगार तयार झाले? किती परदेशी गुंतवणूक आली? आजच्या काळात अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडतायेत मग त्या भारतात का येत नाही? मेक इन इंडिया यशस्वी असेल तर त्या कंपन्या भारतात का येत नाही? अनेक कंपन्यांना देशात यायचंय पण त्यांना येऊ दिले जात नाही. कंपन्यांना सुविधा दिल्यात का? मित्रांसाठी काम केले जातेय असा आरोप करत मुख्यमंत्री केसीआर यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, वेळ परिवर्तनाची आहे. देशाच्या राजकीय क्षेत्रात बदल झाला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतायेत. देशात सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पाण्याचे धोरण १०० टक्के बदलले पाहिजे. देशात परिवर्तन व्हायला हवं. आपल्याला मुलभूत सुविधा देता येत नाही. प्रत्येक क्षेत्रात आपण मागे आहोत. धर्म जातीच्या नावावर विभाजन केले जातेय. लोकांसमोर वास्तव येत नाही. जनतेसमोर हे सत्य यायला हवं. लोकशाहीचे ४ स्तंभात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. भारत राष्ट्र समिती हा पक्ष नाही तर मिशन आहे. देशाच्या विकासासाठी परिवर्तन घडवण्याचं मिशन आहे. जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोवर हे शक्य नाही असं त्यांनी सांगितले. 

महिलांना शासक बनवूआपल्या देशात ५० टक्के महिला आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग झाला तर देश प्रगतीच्या मार्गावर जाईल. देशाला पुढे जायचे असेल तर महिला सबळीकरण गरजेचे आहे. जर देशात आमचे सरकार आले तर प्रत्येक क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व दिले जाईल. महिलांना शासक बनवले जाईल असं आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी दिले आहे. तसेच देशातील प्रत्येक विधानसभा, लोकसभा, संसदेत १ वर्षात ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवला जाईल. भारतातील प्रत्येक महिलेला मी हे वचन देतो. बेटी पढाओ, बेटी बचाओ नारा खूप दिला. परंतु वास्तविक मुली, महिलांसोबत काय घडतेय हे पाहून शरमेने मान खाली जाते. राजकीय इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. हे आम्ही पाहिलंय असं त्यांनी सांगितले. 

LIC चं खासगीकरण होऊ देणार नाहीदेशातील सर्वात मोठी कंपनी विमा कंपनी आहे. मग LIC का विकत आहे? अदानीचे शेअर्स पडतायेत त्यावर संयुक्त चौकशी समिती नेमा. इतका मोठा घोटाळा झाला. आठवडाभरात १० लाख कोटी बुडतायेत. यात देशाची बँकिंग व्यवस्था, LIC सहभागी आहे. हा जनतेचा पैसा आहे. देश तुम्हाला दोषी ठरवतेय तुम्ही चौकशी करा. अदानी तुमचे मित्र आहे. जगात नंबर २ श्रीमंत यादीत अदानी पोहचले कसे? LIC कर्मचारी, एजेंट आणि २५ कोटी खातेदारांना आम्ही आश्वासन देतो जर मोदी सरकारनं LIC खासगीकरण केले तर आम्ही पुन्हा सरकारी करू असंही मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. 

त्याचसोबत आज देशात धंदा सुरू आहे. खासगीकरण सुरू आहे. जिथे नुकसान होते तिथं जनतेवर जबाबदारी ढकलायची. ज्यात नफा मिळतो त्या कंपन्या खासगी केल्या जातात. आपल्या देशाला वीज पुरवठा करण्यासाठी कुणाच्याही मदतीची गरज नाही. २४ तास लोकांना वीज देणे शक्य आहे. कोळसा खाणी इतक्या देशात आहेत. ३६१ बिलियन्स टन कोळसा खाणीत आहे. १२५ वर्ष देशाला पूर्ण वीज देण्यास सरकार समर्थ आहे. खासगीकरण का करतात? लाखो कर्मचारी आहेत मग सरकार वीज का देत नाही. सर्व कारभार खासगी केला तर जनतेची लूट होईल. पवनहंस ही कंपनी सरकारी होती ती कमी दरात विकली गेली. अनेक कंपन्या कमी दरात विकल्या जात आहेत. बँकिंग व्यवस्था धोक्यात येतेय. मनमानीप्रमाणे खासगीकरण केले जाते हे आम्ही खपवून घेणार नाही असंही केसीआर यांनी म्हटलं. 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNarendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडिया