मुंबई : मेक इन इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या देशीविदेशी पाहुण्यांमुळे शुक्रवारी मुंबई विमानतळाचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडले. दिवसभरातील जवळपास सर्वच विमानांचे आगमन आणि प्रस्थान रखडल्याने वेळापत्रकाचा मात्र हाल झाले. स्वीडन आणि फिनलंडचे राष्ट्रप्रमुख, सौदी अरेबियाचे राजे त्यांच्या शिष्टमंडळासह शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. या नेत्यांसाठी विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे विमान धावपट्टीवर असताना २० मिनिटे अन्य विमानाच्या उड्डाणास अथवा धावपट्टीवर उतरण्यास परवानगी दिली जात नाही. मेक इन इंडियासाठी राष्ट्रप्रमुखांसह विविध राजनैयिक तसेच उद्योग जगतातील मंडळीही मुंबईत दाखल झाली आहेत. या पाहुण्यांमुळे विमानतळाचे दैनंदिन वेळापत्रक मात्र कोलमडले. (प्रतिनिधी)
‘मेक इन इंडिया’चा विमान प्रवाशांना बसला फटका
By admin | Published: February 13, 2016 1:59 AM