लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक सर्व गोष्टी नाशिकमध्ये आहेत. त्यामुळेच नाशिक हा ब्रँड जगभर नेण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वरळी येथे मंगळवारी सुरू झालेल्या ‘मेक इन नाशिक’ या दोन दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) व क्रेडाई नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योगक्षेत्राच्या विस्तारासाठी मुंबईपाठोपाठ पुणेही अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे सध्या उद्योगक्षेत्राच्या विस्ताराला नाशिक हा सर्वोत्तम पर्याय उभा राहत आहे. उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक पाणी आणि वातावरण नाशिकमध्ये उपलब्ध आहे. केवळ नाशिकचे ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यासारखा जागतिक कार्यक्रम नाशिकमध्ये राज्य सरकारने यशस्वीरीत्या पार पाडला. मात्र त्याचे म्हणावे तितके ब्रँडिंग करण्यात सरकार कमी पडले.
‘मेक इन नाशिक’ हा ब्रँड जगभर नेणार! - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 3:28 AM