शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवणार

By admin | Published: April 01, 2016 1:33 AM

भारतीय लष्करात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र फारच कमी आहेत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र बनविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, तोपर्यंत ही

पुणे : भारतीय लष्करात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र फारच कमी आहेत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र बनविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, तोपर्यंत ही क्षेपणास्त्रे आयात करण्यात येणार आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीप्रदान समारंभात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ब्रह्मोसच्या नव्या रेजिमेंट येत्या काही दिवसांत दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय रशियन हेलिकॉप्टर्सदेखील लवकरच सामील होणार आहेत. यामुळे लष्कराची ताकद वाढेल, असे सांगून पर्रिकर यांनी पाकिस्तानी समितीचा पठाणकोट दौरा, लष्करातील मनुष्यबळ कमी करणे, चीन-भारत संबंध अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला. पर्रिकर म्हणाले, ‘पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या समितीला पाहणी करण्याची परवानगी दिली होती. हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) असून, त्यावर तपास सुरू आहे. एनआयएने पाकिस्तानच्या पथकाला पठाणकोटला तपास करण्याची अनुमती दिली आहे. याचा अर्थ, त्यांचा या घटनेशी काहीतरी संबंध नक्कीच आहे. मात्र, अद्याप तपास पूर्ण झाला नसून, यावर इतक्यात भाष्य करणे योग्य ठरणार नाही.’लष्करात ज्या ठिकाणी आवश्यकता नाही, त्या ठिकाणी मनुष्यबळ कमी करण्यावर विचार सुरू आहे, तसेच तीनही दलांचा खर्च कमी करून जवानांच्या क्षमतेत वाढ करावी,’ अशी सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चीनमधून घुसखोरी नाही!चीनचे सैन्य भारतीय सीमेत घुसल्याच्या बातमीचे पर्रिकर यांनी खंडन केले. भारत आणि चीनची सीमारेषा स्पष्ट नसल्यामुळे आपले सैनिक चीनमध्ये व त्यांचे सैनिक आपल्या हद्दीत येतात, याला घुसखोरी म्हणता येणार नाही. सीमा ओलांडल्यास सामंजस्याने या तुकड्या पुन्हा निघून जातात. भारतीय सैन्याचे जवानदेखील अनेक वेळा चीनच्या सीमेमध्ये प्रवेश करतात, असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.