शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘मेक इन महाराष्ट्र’ला हरताळ

By admin | Published: July 16, 2015 12:26 AM

राज्यातील उद्योग वाढवण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ची हाक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या योजनेला उद्योगमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडूनच हरताळ फासला जात असल्याचा

मुंबई : राज्यातील उद्योग वाढवण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ची हाक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या योजनेला उद्योगमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडूनच हरताळ फासला जात असल्याचा आरोप मुंबई मुद्रक संघाने केला आहे. राज्यातील मुद्रण व्यवसाय मंदीत असताना ११ कोटी पाठ्यपुस्तके छपाईचे काम शासनाकडून परराज्यातील मुद्रकांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संघाने सांगितले.या संदर्भात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाच्या अध्यक्षा मेधा वीरकर म्हणाल्या, की राज्यात ४०० मुद्रक असताना पाठ्यपुस्तके छपाईसाठी राज्य सरकार राष्ट्रीय पातळीवर निविदा मागवत आहेत. या उलट गुजरात राज्यातील सर्व पाठ्यपुस्तके छपाईचे काम गुजरातमधील मुद्रकांनाच दिले जाते. त्यामुळे तेथील मुद्रणाच्या व्यवसायात वर्षानुवर्षे प्रगती होत आहे. महाराष्ट्रातील मुद्रणाचे काम बाहेर देऊ नये, म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून उद्योगमंत्री, शिक्षणमंत्री यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत असूनही भेट मिळाली नाही. ७ जुलैला या संदर्भात मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, शिक्षणमंत्री यांना पत्रही पाठवूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे वीरकर यांनी सांगितले. संघाचे सरचिटणीस आनंद लिमये यांनी सांगितले, की पाठ्यपुस्तक मंडळाची निविदा राज्यापुरती मर्यादित ठेवल्यास मुद्रण व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल. कारण राज्यातील छपाईसाठी ४ हजार ५०० मेट्रिक टन इतका कागद मजकूर छपाईसाठी आणि ६७५ मेट्रिक टन कागद मुखपृष्ठ छपाईसाठी लागतो. तो पंजाबमधून आयात केला जातो. छपाईचे कंत्राट मिळवलेल्या बाहेरील राज्यातील मुद्रकांना हा कागद पाठवला जातो. तो छापून पुन्हा आयात केला जातो. त्यामुळे इंधनासोबत बराच वेळ खर्ची घालावा लागतो.स्वाध्याय पुस्तिका सरकारने छापाव्यातपाठ्यपुस्तक मंडळाच्या स्वाध्याय पुस्तिकांचा एक संच प्राथमिक विद्यार्थ्यांना सरासरी १५०, तर माध्यमिक विद्यार्थ्यांना २५० रुपयांना मिळतो. मात्र खासगी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेला तोच संच ७५ ते १०० रुपये अधिक दराने विकला जातो. त्याचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागतो. ११ कोटींमधील अडीच कोटी संच पाठ्यपुस्तक मंडळ प्रकाशित करते. जर उरलेल्या विद्यार्थ्यांसाठीही मंडळाने स्वाध्याय पुस्तिकांच्या संचनिर्मिती केली तर सरकारलाही महसूल मिळेल आणि पालकांची लूट थांबेल, असा विश्वास संघाने व्यक्त केला.