शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

वीज सवलतीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

By admin | Published: December 03, 2015 3:40 AM

वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी राज्यातील उच्चदाब यंत्रमागांना वीजदरातील सवलत यापुढेही चालू ठेवण्यासाठी, शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी राज्यातील उच्चदाब यंत्रमागांना वीजदरातील सवलत यापुढेही चालू ठेवण्यासाठी, शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.राज्यातील उच्चदाब यंत्रमागधारकांना सुरू असलेली वीजदरातील सवलत कायम ठेवण्याची मागणी फेडरेशन आॅफ आॅल इंडिया टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (ऋअकळटअ) शिष्टमंडळाने बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप होगाडे आदींसह वस्त्रोद्योग विभागातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्य शासनाने वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी पुढाकार घेतला असून, कापूस उत्पादक क्षेत्रात कापड गिरण्या सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या उद्योगाच्या वाढीसाठी शासनाने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे मेगा टेक्स्टाईल हब स्थापन केले असून तेथे मोठे उद्योग येण्यासाठी या उद्योगांना पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.’ (प्रतिनिधी)शिष्टमंडळाची विनंतीराज्यात ३५० पेक्षा अधिक उच्चदाब यंत्रमाग असून, आधुनिक यंत्रमागांची संख्या ७० हजारांच्या आसपास आहे. या उद्योगांना वीजदराची सवलत चालू राहिल्यास, त्याचा फायदा राज्यातील उद्योगांना होऊन, या उद्योगांच्या माध्यमातून कामगारांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देता येतील, असेही शिष्टमंडळाने यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.