पुणे : ‘मेक इन इंडिया’मध्ये परकीय ब्रँडना प्रोत्साहन न देता, भारतीय ब्रँड जागतिक स्तरावर उभे करण्याची गरज असल्याचे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी रविवारी व्यक्त केले. जैन समाजाने ठरवले, तर अल्पकाळात जागतिक दर्जाची १०० विद्यापीठे उभी करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे, असेही ते म्हणाले.जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनतर्फे (जितो) आयोजित ‘जितो कनेक्ट २०१६’मध्ये ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, झोन प्रमुख राजेश साकला, मुख्य सचिव नरेंद्र छाजेड, सचिव अजित सेटिया, ज्येष्ठ उद्योगपती रसिकलाल धारीवाल, जितो अॅपेक्सचे चेअरमन तेजराज गुलेचा व अध्यक्ष राकेश मेहता, सचिव धीरज कोठारी, अचल जैन, ओमप्रकाश रांका, चकोर गांधी, शांतिलाल कोठारी, शांतिलाल मुथा, प्रदीप राठोड, शर्मिला ओसवाल, सुधीर दहिया, हरीभाई शहा, अनिरुद्ध देशपांडे, मिलिंद शुक्ला, संजय धारिवाल, पारसमल जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.परकीय ब्रँड भारतात बोलावण्यापेक्षा आपण पुढचा विचार करण्याची गरज आहे़ आम्ही हाच विचार करून प्रतिस्पर्धी ब्रँडच्या चारपट मोठा पतंजली ब्रँड उभा करण्याच्या मार्गावर आहोत. केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर काही तत्त्वावर आधारित व्यवसाय आणि देशसेवेचा वसा यातून हे शक्य होईल. तुम्ही इमानदारीने व्यवसाय केला, तर लोक तुम्हाला पाठिंबा देतात. त्यामुळे इतरांनीही देशांतर्गत मोठे ब्रँड निर्माण करावेत, असे बाबा रामदेव म्हणाले.
‘स्वदेशी’ला जागतिक बनवा
By admin | Published: April 11, 2016 3:19 AM