मिरज (जि. सांगली) : कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषकांची गळचेपी सुरूच आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.मिरज येथे दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ यांच्यातर्फे आयोजित चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषकांना मोठ्या यातना भोगाव्या लागत आहेत. मराठी भाषकांवर सुरू असलेल्या अन्यायाबाबत साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला पाहिजे. समाजात रूंदावणारी धर्म व जातीची दरी नष्ट झाली पाहिजे. स्त्रियांचे प्रश्न साहित्यापुरतेच मर्यादित आहेत. शेतकरी दुर्लक्षित आहेत. कोणीच त्यांना खºयाअर्थाने न्याय दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून साहित्य निर्मिती केली पाहिजे.‘अभिव्यक्ती व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर झालेल्या परिसंवादात डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य झगडून मिळवावे लागते. समोर जळतंय, त्यावर लेखकाचे मत महत्त्वाचे आहे. वादाच्यावेळी कलावंत व लेखक हा सामान्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. कोणाला तरी चांगले वाटण्यासाठी लिहिण्यापेक्षा सत्ताधाºयांशी संघर्ष करणारा सामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतो. प्रा. अविनाश सप्रे म्हणाले, सामाजिक गरजेतून अभिव्यक्ती निर्माण होते. स्वातंत्र्य कशासाठी, हे ओळखले पाहिजे. लोकप्रिय लेखनापेक्षा समाज ढवळणाºया व प्रक्षोभ निर्माण करणाºया साहित्यातून समाजपरिवर्तन होईल. डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, कोरेगाव-भीमा संघर्ष साहित्यातून उमटल्या पाहिजेत.
सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा - सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 4:12 AM