शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

बाइक टॅक्सीचा मार्ग मोकळा?; परवानगी देण्यास प्रशासन अनुकूल मात्र संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 6:45 AM

राज्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी या संवर्गातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

नितीन जगताप मुंबई - राज्यभरातील रिक्षा संघटनांचा बाइक टॅक्सी संकल्पनेला कडाडून विरोध असताना, राज्यात आवश्यक त्या ठिकाणी बाइक टॅक्सींना परवानगी देण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात बाइक टॅक्सीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता  आहे. याबाबतचा अहवाल १५ मार्चपर्यंत राज्य सरकारला देण्यात येणार आहे. ओला, उबर, रॅपिडो यांच्या बाइक टॅक्सीबाबत धोरण ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. 

राज्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी या संवर्गातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमन करून, त्यांना ‘ॲग्रीगेटर’ म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावता यावी, यासाठी समिती नेमली आहे. या वाहनांमुळे इतर वाहनांच्या उत्पन्नावर ही परिणाम होत आहे. त्यामुळे बाइक टॅक्सीसेवेला ‘ॲग्रीगेटर’ म्हणून राज्यात परवानगी द्यावी का, त्यांना कोणत्या मुद्द्यावर परवानगी द्यावी वगैरे मुद्द्यांवर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने अलीकडेच रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यात बाइक टॅक्सीला विरोध दर्शविण्यात आला. 

बाइक टॅक्सीला मागणीबाइक टॅक्सीला प्रवाशांची चांगली मागणी आहे. बाइक टॅक्सी परवडणारी आहे, तसेच ती कमी जागा व्यापते. या सेवेमुळे प्रवासाला कमी वेळ लागून कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल, असे परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

कुठे परवानगी  मिळणार? राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीची अन्य सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते, अशा ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे. 

काय असतील नियम?रिक्षासाठीचे नियम लागू असणार बाइक टॅक्सीची परिवहनेतर संवर्गात नोंदणी होईल. बाइक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती.बाइक टॅक्सीला पिवळ्या रंगाची नंबरप्लेट असणार

बाइक टॅक्सीबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करून, मगच अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर, निर्णय घेतला जाईल. - विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

बाइक टॅक्सीविरोधात आम्ही पुण्यामध्ये रस्त्यावरची लढाई जिंकलो. सुप्रीम कोर्टातही आमचा विजय झाला. आता बाइक टॅक्सीला परवानगी देण्याच्या हालचाली समितीने सुरू केल्या आहेत. राज्यात कोणत्याही परिस्थितीत बाइक टॅक्सीला परवानगी देऊ नये, अन्यथा तीव्र विरोध केला जाईल.- बाबा कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती.

टॅग्स :bikeबाईक