ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - रात्रभरच्या मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबईला झोपडून काढले असतानाच मालाडमध्ये एक विशाल झाड कोसळून पडले. या झाडाखाली चिरडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सुंदरनगर परिसरात शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. हा इसम मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना हा प्रकार घडला. त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी स्थानीक रुग्णालयात पाठविण्यात आला असुन त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच अग्निशमन दलाचे जवान हे झाड हलविण्याचा प्रयत्न करत आहेत. यात एका कारचेेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.