खोडद : चालू वर्षी माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतानाच मंगळवारी रात्री १०:१५ च्या सुमारास पुन्हा छत्री पॉइंटच्या पुढे ४०० मीटर अंतरावर (कि.मी.९३/७०० येथे) डोंगरकड्याचा काही भाग कोसळून त्यातील मलबा खाली रस्त्यावर आल्याने घाट रस्ता बंद झाला. यामुळे मंगळवारी रात्रीपासून आज दिवसभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली.सदर घटनेची माहिती समजताच राष्ट्रीय महामार्ग व टोकावडे पोलिसांनी घाटात जाऊन घटनेची पाहणी केली. मात्र, रात्री उशिरा घटना घडल्याने तसेच पाऊस जोरदार असल्याने रस्त्यात आलेला राडारोडा बाजूला करणे शक्य नव्हते. बुधवारी सकाळपासून २ जेसीबीच्या साह्याने रस्त्यात आलेला मलबा बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मुरबाडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील, टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, राष्ट्रीय महामार्गाचे स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी हे घाटात हजर होते.यंदा असणारा मुसळधार पाऊस आणि माळशेज घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना यामुळे माळशेज घाटात पर्यटनासाठी जाणे व घाटातून प्रवास करणे अधिकच धोकादायक झाले आहे. >दरड कोसळ्याची चौथी घटना३ जुलैरात्री १० च्या सुमारास माळशेज घाटात गणपती मंदिराच्या पुढील वळणाजवळ मोठी दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. १० जुलै पहाटे माळशेज घाटाच्या शेवटी दरड कोसळण्याची दुसरी घटना घडली होती. या घटनेत ट्रक दरडीखाली सापडून ट्रक रस्त्याच्या खाली गेला होता. या अपघातात ट्रकचा क्लीनर गंभीर जखमी झाला होता, तर ट्रकचालक बेपत्ता आहे. ११ जुलैसकाळी ९ वाजता याच मार्गावर करंजाळे गावाजवळ डोंगरकडा कोसळून माती व दगडांचा खच रस्त्यावर येऊन रस्ता पूर्णपणे बंद झाला. या घटनेत कोणताही अपघात किंवा जीवितहानी झाली नव्हती.>शाळेतीलविद्यार्थ्यांचीअडचणपावसामुळे नीरा देवघर धरणांतर्गत असलेल्या रिंगरोडवरील कळंबाचा माळ येथील मोरीवर डोंगरातील माती वाहून आली असून, रोडवर गुडघाभर पाणी आले आहे. धनगरवाड्याजवळ दरड कोसळल्याने एसटीसह सर्वच वाहतूक बंद होती. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली. पावसामुळे काही शाळा बंद ठेवण्यात आल्या़
माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली
By admin | Published: August 04, 2016 1:05 AM