मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) लागू होत नाही, असा दावा करणारी याचिका या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व समीर कुलकर्णीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सोमवारी ही याचिका फेटाळून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.सत्र न्यायालय योग्य वेळी तुमचे म्हणणे ऐकून घेईल, असे म्हणत न्या. नरेश पाटील व न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांनी पुरोहित व कुलकर्णीच्या याचिका फेटाळल्या. आरोपींवर यूएपीए लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने विशेष समितीची नियुक्ती केली नाही. त्यामुळे आरोपींवर यूएपीएअंतर्गत आरोप निश्चितीचा प्रश्नच नाही, असा युक्तिवाद पुरोहितचे वकील श्रीकांत शिवडे यांनी केला.त्यावर सत्र न्यायालय याबाबत योग्य वेळी निर्णय घेईल, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे,’ असा युक्तिवाद यएनआयएचे वकील संदेश पाटील म्हणाले यांनी केला. आरोपींनी सत्र न्यायालयात आरोपमुक्ततेसाठी केलेल्या अर्जाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यांनी निकाल राखून ठेवल्याने न्यायालयाने दोघांचा अर्ज फेटाळला.
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: पुरोहित, कुलकर्णीचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:09 AM